उत्तरप्रदेशप्रमाणे आता उत्तराखंडमध्येही मदरशांचे सर्वेक्षण होणार !

एकेका राज्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवरच असा निर्णय घेतला पाहिजे, असेच जनतेला वाटते !

देशातील ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांमध्ये महिला एकाहून अधिक पुरुषांशी ठेवतात लैंगिक संबंध !

धर्माचरणाच्या अभावी भारताची पाश्‍चात्यांप्रमाणे होत असलेले जलद  नैतिक अधःपतन !

कारवायांमध्ये वाढ होऊनही लाचखोरीला आळा घालण्यात अपयश !

वर्ष २०१० पासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांची संख्या वाढत आहे. कारवाया वाढल्या असल्या, तरी त्यातून सरकारी यंत्रणेतील लाचखोरी न्यून न होता दिवसेंदिवस वाढत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अडीच वर्षांत १० सहस्र बालविवाह !

बालविवाहामुळे मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. बालविवाह रोखण्यासाठी सरकारने दायित्व निश्चित केलेले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर बडतर्फीची कारवाई करून त्यांना कठोर शासन केले पाहिजे.

फेरीवाल्यांनी ‘बायोमेट्रिक सर्वेक्षण’ करावे ! – फेरीवाला समिती

फेरीवाल्यांनी ‘बायोमेट्रिक सर्वेक्षण’ केलेले नाही, त्यांनी ८ दिवसांत सर्वेक्षण करावे.

भारतातील कार्बन उत्सर्जन केवळ ५ टक्के !

पंतप्रधान मोदी यांचे ‘जी-७’ शिखर परिषदेत प्रतिपादन !

पत्रकार राणा अयुब यांचे ट्विटर खात्यावर बंदी

काशी येथील ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात केलेल्या ट्वीटमुळे ट्विटरने पत्रकार राणा अयुब यांच्या ट्विटर खात्यावर बंदी घातली आहे. भारत सरकारने राणा अयुब यांच्या खात्यावर कारवाई करण्याची मागणी ट्विटरकडे केली होती.

गोव्यात ५ मासांत अडीच कोटी रुपयांचे अमली पदार्थ कह्यात !

उत्तर कर्नाटक, गदग जिल्हा, खानापूर आणि हुलिया या दुर्गम भागांत उसाच्या शेतीत मधोमध काही चौरस मीटरमध्ये गांजाची लागवड केली जाते आणि याचे पूर्ण नियंत्रण अमली पदार्थ माफियांकडे असते. या अमली पदार्थांची पुढे गोव्यात तस्करी केली जाते.

महाराष्‍ट्रातील महत्त्वाच्‍या विभागांंमधील लाचखोरीची प्रकरणे !

मागील १२ वर्षांत महसूल विभागामध्‍ये एकूण २ सहस्र ९९८ जण लाच घेतांना पकडले गेले. या आकडेवारीनुसार महसूल विभागातही प्रत्‍येक मासाला लाचखोरीची २० प्रकरणे घडत आहेत.

शांततेची परिभाषा काय ?

भारतात अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे !