कोल्‍हापूर बसस्‍थानकातील नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर करा ! – सुराज्‍य अभियानाचे निवेदन

सध्‍या उन्‍हाळ्‍याचा काळ चालू असून प्रवाशांना पुरेसे आणि स्‍वच्‍छ पाणी न मिळणे, हे अत्‍यंत दुर्दैवी आहे. तरी नादुरुस्‍त नळ, तसेच अन्‍य त्रुटी दूर कराव्‍यात, या मागणीचे निवेदन राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कोल्‍हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्‍के यांना देण्‍यात आले.

सोलापूर बसस्‍थानकातील अस्‍वच्‍छता दूर करून नागरिकांना आवश्‍यक सुविधा त्‍वरित पुरवाव्‍यात !

येथील बसस्‍थानकाच्‍या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या, पिशव्‍या, चिखल आणि बसस्‍थानकावर उघड्यावर करण्‍यात येत असलेले मूत्रविसर्जन यांमुळे बसस्‍थानकावर अत्‍यंत अस्‍वच्‍छता असून दुर्गंधी पसरली आहे.

एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर परिवहनमंत्री आणि आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली !

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून करण्यात आलेली तक्रार यांमुळे एस्.टी. महामंडळाने संकेतस्थळावर स्वत:चे अध्यक्ष अर्थात् परिवहनमंत्री आणि परिवहन आयुक्त यांची नावे अंतर्भूत केली आहेत.

जळगावच्या एस्.टी. स्थानकाची स्वच्छतामोहीम केवळ कागदावरच आहे का ? – ‘सुराज्य अभियाना’चा एस्.टी. च्या अधिकार्‍यांना प्रश्‍न

गेल्या मासापासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील विविध एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली जात आहे. त्याची नोंद घेत सुराज्य अभियानाने ही अभिनंदनीय कृती केली.

नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करून अहवाल सादर करा ! – साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आदेश

प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा.

राज्यातील १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांनापुढे सादर !

‘स्वच्छतामोहीम हाती घेऊन ४ मास झाले, तरी बसस्थानकांवर इतकी अस्वच्छता असेल, तर राज्यात बसस्थानक स्वच्छता मोहीम खरोखरच राबवली जात आहे का ?’ याविषयी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.

श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराचे प्रकरण पडताळून कार्यवाही करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणातील सर्व माहिती पडताळून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

सोलापूर रेल्वेस्थानकात बंद अवस्थेतील ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ चालू करावे !

अशी मागणी का करावी लागते ? रेल्वे प्रशासन यासंदर्भात स्वतःहून कृती का करत नाही ?

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – उन्मेष पाटील, खासदार, भाजप

सुराज्य अभियानाकडून उन्मेष पाटील यांना निवेदन सादर

परीक्षाकाळात ध्‍वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांवर कारवाई करा !

सध्‍या दहावी-बारावीच्‍या विद्यार्थ्‍यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्‍यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्‍यांमुळे, तसेच अन्‍य काही लोकांकडून होणार्‍या ध्‍वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्‍यांच्‍या अभ्‍यासात अडचणी येत असल्‍याच्‍या तक्रारी येत आहेत.