हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ची गृहमंत्री कार्यालयात निवेदनाद्वारे मागणी
मुंबई – सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसातून ५ वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांकडून होणार्या ध्वनीप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश आवाजात भोंगे वाजत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी केली. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्राच्या गृहमंत्री कार्यालयात पाठवण्यात आले आहे.
‘सुराज्य अभियाना’चे प्रसिद्धी पत्रक –
या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
१. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच सुप्रसिद्ध गायक श्री. सोनू निगम यांनी मशिदींवरील भोंग्यांद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाविषयी जोरदार आवाज उठवला होता; मात्र तत्कालीन शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची कार्यवाही जाणीवपूर्वक टाळली होती. आता केंद्रात आणि राज्यात सर्व समाजघटकांचे हित पहाणारे शासन सत्तेत आले आहे. त्यामुळे शासनाने ‘या संदर्भात तातडीने ध्वनीप्रदूषण करणार्यांवर कठोर कारवाई करावी’, अशी आमची मागणी आहे.
२. प्रत्येक मशिदीत दिवसातून ५ वेळा भोंगे वाजतात. एका भोंग्यातून न्यूनतम १२० डेसिबल इतक्या मोठ्या प्रमाणात आवाज येतो. ध्वनीप्रदूषण कायद्यानुसार ७५ डेसिबल ही औद्योगिक क्षेत्रासाठीची कमाल मर्यादा आहे. निवासी भागांत तर ती ५५ डेसिबल इतकीच आहे. त्यामुळे अशा भोग्यांना कायद्यानुसार अनुमती मिळू शकत नाही. असे एक नव्हे, तर प्रत्येक मशिदीवर किमान ४, ८ किंवा १२ भोंगे लावलेले असतात. यांतून किती ध्वनीप्रदूषण होत असेल ?, याची कल्पना करता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात आणि शांत झोप मिळण्यात अडचणी येत आहेत. या समस्येकडे ‘गंभीर सामाजिक समस्या’ म्हणून पहायला हवे. प्रथम किमान परीक्षाकाळात तरी भोंगे बंद करायला हवेत. त्यानंतर ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ओलांडणार्या सर्वच मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला हवी.