हिंदूंचे शौर्य आणि संघटन यांचे प्रतीक असलेल्या धुळे येथील भव्य हिंदू जनआक्रोश मोर्च्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धुळे जिल्हाप्रमुख संजय शर्मा यांचे आवाहन !

मद्यालये आणि बार यांना देवतांची नावे न देण्याच्या शासन निर्णयावर ७ मासांत एकही कारवाई नाही !

देवतांची नावे कोणती ? याविषयी स्पष्टता नसल्यामुळे कारवाईविषयी संभ्रम ! राज्यात श्रीराम, श्रीगणेश या देवतांच्या, तसेच अहिल्यादेवी आदी श्रद्धेय व्यक्तींच्या नावाने बिअर शॉपी, मद्यालये आदी आहेत, हे अवमानकारक आहे.

हिंदु जनजागृती समितीद्वारे ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांना ‘हलाल जिहाद’ ग्रंथ भेट !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी ह.भ.प. अच्युत महाराज दस्तापूरकर यांना समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्याविषयीची माहिती देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

२८ नोव्हेंबरला ‘विराट हिंदू मूक मोर्चा’द्वारे नाशिककर ‘लव्ह जिहाद’विरोधात संघटित होणार !

येत्या २८ नोव्हेंबरला ‘लव्ह जिहाद’विरोधात नाशिककर एकवटणार आहेत. सकल हिंदु समाजाच्या वतीने २८ नोव्हेंबरला विराट हिंदू मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच विराट मोर्च्याच्या नियोजनाची बैठक नाशिकमध्ये पार पडली.

हिंदु महिलांवरील अत्याचाराच्या घटना न थांबल्यास आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येईल ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’ विरोधात येवला येथील हिंदुत्वनिष्ठ मूक मोर्च्याद्वारे एकवटले ! या घटना थांबल्या नाहीत, तर याच येवल्यामध्ये आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ येणार आहे.

आता प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य ‘शिवप्रताप स्मारक’ उभारा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

छत्रपती शिवरायांनी जसा जुलमी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून महापराक्रम केला, याच प्रकारे छत्रपती शिवरायांचा पराक्रम दाबण्याचा आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करणार्‍या अनधिकृत बांधकामांचा शासनाने कोथळा बाहेर काढला आहे.

त्रिपुरारि पौर्णिमेला सहस्रावधी भाविकांनी महाआरती करून घेतले बाणगंगेचे दर्शन !

भारत ही पुण्य आणि धर्म भूमी आहे. स्वामी विवेकानंद यांनी ‘पाश्चात्त्य लोक देवापेक्षा देहावर प्रेम करतात; परंतु या जगात एका देशातील लोक देहापेक्षा देवावर प्रेम करतात, तो देश भारत आहे’, असे भारतदेशाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

हिंदुत्वनिष्ठांच्या तीव्र विरोधामुळे मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ रहित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे ‘हलाल प्रमाणित’ वस्तूंचे विज्ञापन करण्यासाठी मुंबईत आयोजित केलेला ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित केल्याची घोषणा आयोजकांनी केली. ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ने यासाठी विविध माध्यमांतून पुष्कळ विरोध केला होता.

मुंबईच्या पोलीस सहआयुक्तांना निवेदन !

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणारा ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित करण्याविषयी ‘हलाल सक्तीविरोधी  कृती समिती’च्या वतीने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

दादर येथे हलालविरोधी बैठकीचे आयोजन !

मुंबईतील ‘हलाल शो इंडिया’ला विरोध करण्यासाठी येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, समन्वयक श्री. बळवंत पाठक आणि श्री. प्रदीप ओक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.