कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची सनातन संस्‍थेचे सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी घेतली सदिच्‍छा भेट !

कथाकार पंडित प्रदीप मिश्रा आणि सद़्‍गुरु नंदकुमार जाधव

बुर्‍हाणपूर (मध्‍यप्रदेश) – येथील गोकुळ चंद्रमा मंदिरात प्रसिद्ध कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांची सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी सदिच्‍छा भेट घेतली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट उपस्‍थित होते.

या वेळी सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांना ‘लव्‍ह जिहाद’, ‘हलाल जिहाद ?’ आणि ‘हिंदु राष्‍ट्र का हवे ?’, हे हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिले. या वेळी पंडित मिश्रा यांना सनातन संस्‍थेच्‍या रामनाथी आश्रमाला भेट देण्‍याविषयी निमंत्रण देण्‍यात आले.