अपंग विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर विशेष शैक्षणिक कार्यक्रम राबवा ! – मुंबई उच्च न्यायालय
दूरदर्शनवरून शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवावा, = मुंबई उच्च न्यायालय.
दूरदर्शनवरून शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम राबवावा, = मुंबई उच्च न्यायालय.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्यामुळे राज्यातील ५२ सहस्रांहून अधिक शालेय बसगाड्या जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे मालक, चालक आणि साहाय्यक यांसहित दीड लाख लोक आर्थिक संकटात सापडले आहेत.
वार्षिक कर भरणार्या परिवहन संवर्गातील सर्व प्रकारच्या वाहनांना कोरोना काळातील एप्रिल ते सप्टेंबर २०२० या ६ मासांच्या कालावधीसाठी सरसकट करसवलत देण्याविषयीचे नवे आदेश शासनाने काढले आहेत.
मूल्यांकनात पात्र ठरलेल्या खासगी शाळांना अनुदान पात्र घोषित करणे आणि २० टक्के अनुदानाने चालू असलेल्या शाळांना वाढीव अनुदान देणे, असा निर्णय राज्य सरकारने ऑक्टोबर मधील बैठकीत घेतला आहे.
अशा गुन्ह्यांमध्ये लगेच आणि कठोर शिक्षा होत नसल्याने असे गुन्हे करणार्यांना कायद्याचा कोणताही धाक वाटत नाही. त्यामुळे गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची आवश्यकता आहे.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या संघटनेकडून गोव्यातील इयत्ता १० वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी बाबरी मशिदीवर आधारित अखिल गोवा निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शिव-समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतच काही संघटनांनी ‘समर्थ रामदासस्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते’, असा अपप्रचार चालू केला आहे. या संघटनांनी हे शिल्प हटवण्याचा पवित्रा घेतला असून याविषयीचे निवेदन सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एस्.टी. महामंडळ प्रशासन यांना देण्यात आले आहे.
गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन कायद्याच्या विरोधात ८ डिसेंबरला राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक यांनी दिली.
महावितरणच्या गोंधळामुळे त्यांनी जनतेची विश्वासार्हता गमावली आहे.