वैद्यकीय उपचार करतांना अध्यात्मशास्त्र अंतर्भूत केल्यास रोगाचे निदान आणि उपचार अधिक प्रभावीपणे करणे शक्य ! – डॉ. (सौ.) ज्योती खोदनापूर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वैद्यकीय क्षेत्रात अध्यात्मशास्त्र अंतर्भूत करणे’ या विषयावर ‘वेबिनार’

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने ‘सूर्योपासने’विषयीचे संशोधन सादर

सूर्योपासनेविषयीचे अध्यात्मशास्त्र वैज्ञानिक भाषेत समजावून सांगण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने यासंबंधी केलेले आध्यात्मिक संशोधन सांगणारा व्हिडिओ सादर करण्यात आला. हे संशोधन ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म-परीक्षण यांच्या साहाय्याने करण्यात आले.

देवतेला अन्नाचा नैवेद्य दाखवून ते प्रसादस्वरूपात ग्रहण करणे आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे यांत जाणवलेला भेद

देवतेला नैवेद्य दाखवून  आणि नैवेद्य न दाखवता अन्न ग्रहण करणे याविषयीचा एक प्रयोग महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयात करण्यात आला. त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचे धर्माचरणास उद्युक्त करणारे विचार

धर्मपरंपरेने जे बंधन घातले आहे, त्यानुसार आपल्याला कार्य करायला हवे; मात्र लोकांना आकर्षित करण्यासाठी आपण जे अनावश्यक धारण करत आहे, ते धर्माचे विडंबन आहे, हे समजायला हवे.

महालय श्राद्धाचा श्राद्धकर्त्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी

यावर्षी २ ते १७ सप्टेंबर २०२० हा पितृपक्षाचा काळ आहे. या काळात केलेल्या महालय श्राद्धाचा श्राद्ध करणार्‍यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .

पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे

भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते.

सनातनचे ‘बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे ‘जावळ’ काढल्यावर त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यात पुष्कळ वाढ होणे आणि जावळ काढण्यासाठी वापरलेल्या वस्तू चैतन्याने भारित होणे

५.३.२०२० या दिवशी सनातनचे ‘दुसरे बालसंत’ पू. वामन राजंदेकर यांचे सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘जावळ’ काढण्यात आले. या संस्काराचा त्यांच्यावर होणारा आध्यात्मिक स्तरावरील परिणाम अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. त्याचे विवरण प्रस्तुत करीत आहोत . . .

‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर हानीकारक परिणाम होतो !

‘व्हिडिओ गेम्स’ खेळल्यामुळे आपल्यावर सूक्ष्म स्तरावर काय परिणाम होतो’, हे आधुनिक वैज्ञानिक उपकरण आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या माध्यमातून जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निष्कर्ष संक्षिप्त रूपाने येथे देत आहोत.

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर सकारात्मक परिणाम होणे

‘श्री सिद्धिविनायक मूर्ती प्रतिष्ठापना विधी’चा विधीतील घटक आणि पुरोहित यांच्यावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.

सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

नातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १५.१०.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली.