बिस्किटे बनवतांना त्यांना विविध आकार (shapes) दिल्याने त्यांच्यावर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम जाणून घ्या !
|
बेकरीत बिस्किटे बनवतांना ती आयताकृती, चौकोनी, गोल, चांदणी, फुले इत्यादी विविध आकारांत (shape) बनवण्यात येतात. तसेच बिस्किटे आकर्षक दिसावीत, यासाठी बिस्किटांवर कलाकुसर करण्यात येते, उदा. त्यांच्यावर उभ्या किंवा आडव्या रेषा उमटवणे, विविध आकृत्या उमटवणे इत्यादी. विविध आकारांतील बिस्किटांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी १३.१२.२०२० या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत सनातनच्या आश्रमातील बेकरीत बनवलेली आयताकृती, चौकोनी, गोल, चांदणी, फुले इत्यादी विविध आकारांतील बिस्किटांची निरीक्षणे करण्यात आली. ती पुढे दिली आहेत.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – असात्त्विक आकारांतील बिस्किटांमधून नकारात्मक स्पंदने, सात्त्विक आकारांतील बिस्किटांमधून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. स्टार आणि रेनड्रॉप या आकारांतील बिस्किटांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली. त्यांच्यामध्ये अत्यल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली.
२. सहा पाकळ्यांच्या फुलाच्या आकारातील बिस्किटांमध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आढळली. पंधरा पाकळ्यांच्या फुलाच्या आकारातील बिस्किटांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या दोन्ही बिस्किटांमध्ये स्टार आणि रेनड्रॉप या आकारांतील बिस्किटांच्या तुलनेत अधिक सकारात्मक ऊर्जा आहे.
३. आयताकृती, चौकोनी आणि गोल आकारांतील बिस्किटांमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली. आयताकृतीपेक्षा चौकोनी आकारातील बिस्किटांमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आहे.
४. गोल आकारांतील बिस्किटांपैकी कलाकुसर नसलेल्या बिस्किटांमध्ये सर्वाधिक सकारात्मक ऊर्जा आहे.
२. निष्कर्ष
स्टार आणि रेनड्रॉप यांसारखे आकार असात्त्विक आहेत. फुलांच्या आकारापेक्षा आयताकृती, चौकोनी आणि गोल हे आकार उत्तरोत्तर अधिक सात्त्विक आहेत. बिस्किटे बनवतांना सात्त्विक आकारात बनवणे आवश्यक आहे, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. असात्त्विक आकारांतून नकारात्मक स्पंदने, तर सात्त्विक आकारांतून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : प्रत्येक आकाराची स्पंदने निराळी असतात. स्पंदनांनुसार आकारांची सात्त्विक, राजसिक आणि तामसिक अशी विभागणी करता येईल. चाचणीतील बिस्किटांना चौकोनी, आयताकृती, गोल, स्टार, रेनड्रॉप इत्यादी विविध प्रकारचे आकार दिले होते, तसेच गोल आकारातील बिस्किटांवर जाड-बारिक रेषा उमटवल्या होत्या. बिस्किटांतून प्रक्षेपित होणारी चांगली किंवा त्रासदायक स्पंदने ही बिस्किटांचा आकार (Shape), त्यावर उमटवलेल्या आकृत्या आणि त्यांची रचना इत्यादी घटकांवर अवलंबून असतात. बिस्किटांचा आकार आणि त्यांवरील आकृत्या जेवढ्या सात्त्विक, तेवढी त्यातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. याचाच प्रत्यय चाचणीतून पुढीलप्रमाणे आला.
३ अ १. असात्त्विक आकारातील बिस्किटांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : स्टार आणि रेनड्रॉप या आकारांमध्ये बिस्किटांना टोकदार आकार प्राप्त होतात. टोकांमधून त्रासदायक स्पंदने प्रक्षेपित होतात. त्यामुळे या दोन्ही आकारांत बिस्किटे बनवणे आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक आहे.
३ अ २. फुलांच्या आकारातील बिस्किटांमधून अल्प प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : फुलांच्या आकारातील बिस्किटांपेक्षा आयताकृती, चौकोनी आणि गोल आकारातील बिस्किटांमध्ये पुष्कळ अधिक सकारात्मक स्पंदने आहेत. यामुळे फुलांच्या आकारात बिस्किटे बनवण्यापेक्षा आयताकृती, चौकोनी आणि गोल आकारांत बिस्किटे बनवणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी आहे.
३ अ ३. सात्त्विक आकारातील बिस्किटांमधून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : आयताकृती, चौकोनी आणि गोल आकारांतील बिस्किटांमध्ये नकारात्मक स्पंदने मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक स्पंदने आहेत. त्यातही गोल आकारातील कलाकुसर नसलेल्या बिस्किटांमध्ये सर्वाधिक सकारात्मक स्पंदने आहेत. यातून बिस्किटे बनवतांना गोल आकारात आणि त्यावर कलाकुसर न उमटवता बनवणे आरोग्याच्या दृष्टीने सर्वाधिक लाभदायी आहे, हे लक्षात येते. (सनातनच्या आश्रमातील बेकरीत कलाकुसर नसलेली गोल आकारातील बिस्किटेच का बनवली जातात? हे या संशोधनातून लक्षात येते. – संकलक)
थोडक्यात, बिस्किटांसारखा पदार्थ बनवतांना अन्य घटकांसमवेत (उदा. पदार्थ बनवण्याचे ठिकाण, पदार्थ बनवणारी व्यक्ती, पदार्थ बनवण्यासाठीचे जिन्नस इत्यादींसह) त्याचा आकारही सात्त्विक असणे आवश्यक आहे, हे या संशोधनातून लक्षात येते.
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१२.२०२०)
ई-मेल : [email protected]