आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘सध्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी विविध आस्थापने त्यांच्या उत्पादनांची आकर्षक विज्ञापने (जाहीराती) प्रसारित करतात. त्यांचा समाजमनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. समाज या उत्पादनांकडे सहजरित्या आकर्षित होतो. या उत्पादनांपैकी एक म्हणजे बिस्किटे ! हल्ली सर्वांनाच बिस्किटे खायला आवडतात. पेठेतही (बाजारात) आकर्षक वेष्टनांतील विविध ‘ब्रॅन्ड’ची बिस्किटे विक्रीसाठी उपलब्ध असतात. ‘चॉकलेट’ फ्लेवर (चॉकलेटच्या चवीची) आणि ‘क्रीम’ बिस्किटे (पिठीसाखर, न वितळणारा लोणीसदृश पदार्थ आणि इसेन्स् (सुगंध) एकत्र करून बनवलेल्या मिश्रणाला ‘क्रीम’ म्हणतात. दोन बिस्किटांमध्ये क्रिमचा पातळ थर देऊन ही बिस्किटे बनवतात.) लहान मुलांना विशेष प्रिय आहेत. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने बिस्किटे या पदार्थाच्या संदर्भात विपुल संशोधन करण्यात येत आहे. पेठेतील (बाजारातील) काही लोकप्रिय (पॉप्युलर) बिस्किटांमधून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा विज्ञानाद्वारे अभ्यास करण्यासाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे बिस्किटांची चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण :
चाचणीतील बिस्किटांमध्ये पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असणे : चाचणीतील बिस्किट क्र. १ ते ४ यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आढळली. चाचणीतील बिस्किट क्र. ५ मध्ये अल्प प्रमाणात नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा आढळली. हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.
२. चाचणीतील बिस्किटांमधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
एखाद्या पदार्थाची सात्त्विकता अनेक घटकांवर अवलंबून असते, उदा. बिस्किटे हा पदार्थ बनवतांना उपयोगात आणलेले साहित्य (पीठ, साखर इत्यादी), बिस्किटे बनवण्याचे ठिकाण, बिस्किटांचा आकार, त्यावर उमटवलेल्या आकृत्या आणि त्यांची रचना, बिस्किटे बनवणारी व्यक्ती इत्यादी घटक जेवढे सात्त्विक, तेवढा तो पदार्थ सात्त्विक बनतो. (‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने याविषयी विपुल संशोधन करण्यात येत आहे. – संकलक) सध्याचे वातावरण अत्यधिक रज-तमप्रधान असल्याने त्याचा वाईट परिणाम अन्नपदार्थ, वनस्पती, प्राणी-पक्षी, व्यक्ती इत्यादींवर होतो. यामुळे त्यांच्यावर काळे (त्रासदायक स्पंदनांचे) आवरण येते. हे आवरण स्थूल डोळ्यांनी दिसू शकत नाही; पण त्याचे दुष्पपरिणाम होतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. चाचणीतील लोकप्रिय बिस्किटांमधून पुष्कळ नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली. नकारात्मक स्पंदनांनी भारीत बिस्किटे खाणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही. आरोग्याच्या दृष्टीने घरातील सर्वांनाच, विशेष करून लहान मुलांना बिस्किटे हा पदार्थ खायला देण्यापेक्षा घरी बनवलेले ताजे सकस पदार्थ खायला देणे श्रेयस्कर !’
– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.१२.२०२०)
ई-मेल : [email protected]