भविष्य पाहिल्याचा कांगावा करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांसह ज्योतिषशास्त्रावर टीका !

हिंदु धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राचा ‘शास्त्र’ म्हणून अभ्यास केला जातो. याउलट ज्योतिषशास्त्राचा काडीचाही अभ्यास न करता त्यावर टीका करणारेच खर्‍या अर्थाने अंधश्रद्धाळू आहेत !

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार रुग्णालयात भरती !

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील ‘ब्रीच कँडी’ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ते २ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयात उपचार घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करणारे बडतर्फ ११८ एस्.टी. कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी आंदोलन केल्याने बडतर्फ करण्यात आलेल्या ११८ एस्.टी. कर्मचार्‍यांना १३ ऑक्टोबरपासून सेवेत रुजू करून घेण्यात आले. मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी निर्णय घेतला होता.

व्यक्ती त्याचे कर्म आणि गुण यांमुळे ‘ब्राह्मण’ होतो ! – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक मोहन भागवत  

दीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ?

 ‘ईश्‍वर अवतार घेत नाही, पुनर्जन्म आणि मोक्ष या कल्पना ही सत्यशोधक समाजाची शिकवण !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हिंदु धर्माचे ज्ञान असलेला एकही वक्ता व्यासपिठावर नसतांना हिंदु धर्माविषयी अगाध ज्ञान असल्याप्रमाणे वक्तव्य करणारे स्वत:ला ‘सत्यशोधक’ म्हणवतात, हेच मुळात हास्यास्पद होय !

खोटे आरोप करणार्‍यांवरील कारवाई घोषित करण्याची राज्य सरकारकडे मागणी

पत्राचाळ प्रकरणातील आरोपांवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

पत्राचाळ भ्रष्टाचारातील शरद पवार यांच्या सहभागाची कालबद्ध चौकशी करा !

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांची गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी !

भाजपने वर्ष २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

पुढील निवडणुकीच्या वेळी त्याचे सत्ताधार्‍यांना विस्मरण झाले. आता वर्ष २०२४ मध्ये ५ ‘ट्रिलियन इकॉनॉमी’ हे नवीन आश्वासन दिले जात आहे, अशी टीका राष्ट्र्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

शरद पवारांनी महाराष्ट्राची दिलगिरी व्यक्त करावी ! – आनंद दवे, ब्राह्मण महासंघ

छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय झाला, असे पवारांना वाटत असेल, तर त्यांनी शिवचरित्र लिहून महाराजांवरील अन्याय दूर करावा. शरद पवार हे इतिहासकार नाहीत.

(म्हणे) ‘शिवछत्रपतींवर बाबासाहेब पुरंदरे यांच्याएवढा अन्याय अन्य कुणी केला नाही !’ – शरद पवार

केवळ ब्राह्मण होते; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्य्र होय !