मुंबई, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य पाहिल्याचा कांगावा करत राष्ट्रवादी काँग्रेस, अंनिस, तसेच पुरोगामी मंडळी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांसह ज्योतिषशास्त्रावर टीका करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सौ. सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार आदींचा समावेश आहे.
शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ज्योतिषाकडून भविष्य पाहिलं? अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून निशाणा#EknathShindehttps://t.co/D1vGzsGiyn
— News18Lokmat (@News18lokmat) November 23, 2022
२३ नोव्हेंबर या दिवशी गिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ईशान्येश्वर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडे भविष्य पाहिल्याची चर्चा चालू आहे. याविषयी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री गोशाळा पहाण्यासाठी गेले असल्याचे सांगितले.
(म्हणे) ‘पुरोगामी महाराष्ट्रात नवीन गोष्टी पहायला मिळत आहेत !’ – शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
आपण सध्या नवीन गोष्टी पहात आहोत. याआधी महाराष्ट्रात असे होत नव्हते. मी काही ज्योतिषी नाही. त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही. त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. सुसंगत कार्यक्रम बंद करून शिर्डीला जाणे आणि नंतर सिन्नरला जाऊन कुणाला तरी हात दाखवणे आदी गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. पुरोगामी विचारांचे राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पहायला मिळत आहेत; पण या गोष्टीचा स्वीकारार्ह नाहीत, हे जनता दाखवल्याविना रहाणार नाही.
(म्हणे) ‘मुख्यमंत्री ज्योतिष बघतात, हे ऐकून आम्ही हतबल झालो ! – खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धेच्या विरोधात लढा दिल्यामुळे उभ्या देशात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण झाली. महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी श्रद्धा अवश्य ठेवावी; मात्र अंधश्रद्धेविषयी माझे मत वेगळे आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावे ? हे ऐकून आम्ही हतबल झालो.
(म्हणे) ‘ज्योतिष बघणार्या पुरोगामी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी काय बोलावे ?’ – अजित पवार, विरोधी पक्षनेते
‘ज्योतिषाकडे जाऊन स्वत:चे भविष्य पहाणे कितपत योग्य आहे ? २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे ? पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. काय बोलावे ? आम्ही ऐकून हतबल झालो’, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली.
संपादकीय भूमिकाहिंदु धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राचा ‘शास्त्र’ म्हणून अभ्यास केला जातो. याउलट ज्योतिषशास्त्राचा काडीचाही अभ्यास न करता त्यावर टीका करणारेच खर्या अर्थाने अंधश्रद्धाळू आहेत ! |