नागपूर – आपल्या धर्मशास्त्राला जातीगत विषमता मुळीच मान्य नाही. व्यक्ती त्याच्या कर्मामुळे, गुणांमुळे ब्राह्मण होतो, हे धर्मशास्त्रात स्पष्ट नमूद आहे. मग ही विषमता आली कुठून ? जनुकीय शास्त्रानुसार ८० ते ९० पिढ्यांपूर्वी भारतात आंतरजातीय विवाहपद्धत होती. नंतर हळूहळू ती लोप पावली. त्यामुळे वर्णव्यवस्थेची चौकट अधिक घट्ट झाली. मधल्या काळात जे पाप झाले आहे, त्याचे ब्राह्मणांनी पापक्षालन करायला हवे. देशातून जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था हद्दपार व्हायला हवी. ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्यांचे समूळ उच्चाटन आता करायला हवे, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथे विदर्भ संशोधन मंडळाच्या वतीने ‘वज्रसूची-टंक’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
“वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था समाजातून हद्दपार व्हायला हवी”, सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन! #RSS #MohanBhagwat #India #Cast https://t.co/YrStfmaFEQ
— LoksattaLive (@LoksattaLive) October 8, 2022
‘कुणी जाती किंवा वर्ण व्यवस्था यांविषयी विचारणा केली, तर ‘तो आता भूतकाळ आहे, तो आपण विसरायला हवा’, असेच उत्तर येईल’, असेही भागवत या वेळी म्हणाले.
ब्राह्मणांनी चुका केल्या, तरी त्याला काही ब्राह्मणांनी विरोधही केला होता ! – ब्राह्मण महासंघ
‘त्या काळी काही ब्राह्मणांनी चुका केल्या असतील, तर ब्राह्मण समाजातील काही लोकांनी त्यांना विरोधही केला आहे. असे न म्हणता सरसकट ब्राह्मणांनी पापक्षालन करण्याचे विधान सरसंघचालक यांनी केले, ते चुकीचे आहे’, अशी प्रतिक्रिया ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एका वाहिनीशी बोलतांना दिली आहे. |
(म्हणे) ‘मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या !’ – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
समाजातील एका मोठ्या वर्गाच्या काही पिढ्यांना यातना सहन कराव्या लागल्या. या यातनांची जाणीव त्या घटकाला होत असून हा योग्य पालट आहे; पण नुसती क्षमा मागून चालणार नाही. आपण व्यवहारामध्ये या सर्व वर्गांविषयी कशी भूमिका घेतो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.
सरसंघचालकांच्या वक्तव्यावर शरद पवारांचा निशाणा; म्हणाले, फक्त माफी मागून चालणार नाही, तर व्यवहारातही बदल हवाhttps://t.co/4UFztKzmtm#SharadPawar #ABPnagpur
— ABP माझा (@abpmajhatv) October 8, 2022
संपादकीय भूमिकादीड सहस्र वर्षे हिंदु समाजाला मुसलमान समाजाकडून प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या, त्याविषयी पवार कधी काही बोलत का नाहीत ? |