गोव्यात इयत्ता दहावीचा निकाल ९५.३ टक्के

परीक्षेनंतर १५ दिवसांत निकाल घोषित

पणजी, ७ एप्रिल (वार्ता.) – गोवा शालांत मंडळाने घेतलेल्या इयत्ता १० वीच्या परीक्षेचा निकाल ७ एप्रिल या दिवशी घोषित करण्यात आला. निकाल ९५.३ टक्के लागला आहे. ९५.७१ टक्के मुली, तर ९४.९८ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत.

१८ सहस्र ८३८ विद्यार्थ्यांपैकी १७ सहस्र ९६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा एकूण ३२ परीक्षा केंद्रे बनवण्यात आली होती. परीक्षा झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत निकाल घोषित करण्याचा विक्रम गोवा शालांत मंडळाने केला आहे. यंदा इयत्ता १२ वीचाही निकाल विक्रमी वेळेत घोषित करण्यात आला आहे. गोवा शालांत मंडळाने १ ते २१ मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती.