छतावर फळझाडेही लावता येतात

‘अन्य भाजीपाल्याप्रमाणे विटांच्या वाफ्यात किंवा मोठ्या ड्रममध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी फळझाडांची कलमे सहज लावता येतात. काळजी नियमित घेतल्यास साधारण एक ते दीड वर्षात या झाडांना फळधारणा होऊ लागते.

थंडीच्‍या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी देणे टाळावे !

‘थंडीच्‍या दिवसांत पहाटे दव पडून माती आणि पानेही ओली झालेली असतात. या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी दिले, तर थंड पाण्‍याने मातीतील गारवा आणखीनच वाढतो आणि या अतिरिक्‍त थंडी अन् ओलावा यांमुळे झाडांना अपाय होऊ शकतो.

अतिरिक्‍त ओला कचरा उन्‍हात वाळवून ठेवावा !

अधिकचा ओला कचरा (उदा. मटारची साले, कोथिंबीर, तसेच अन्‍य पालेभाज्‍यांचे देठ) उन्‍हामध्‍ये वाळवून ठेवावा. सुकल्‍यानंतर याचे आकारमान अल्‍प होते आणि आपल्‍याला आवश्‍यकता असेल त्‍यानुसार कुंड्या भरतांना किंवा आच्‍छादनासाठी (भूमी झाकण्‍यासाठी) याचा उपयोग करता येतो.’

जानेवारी-फेब्रुवारी मासांत कोणत्‍या भाज्‍या लावाव्‍यात ?

 ‘जानेवारी-फेब्रुवारी या मासांत उन्‍हाळी भाज्‍यांच्‍या लागवडीचा आरंभ करतात. यांत काकडीवर्गीय सर्व भाज्‍या, उदा. दुधी, कोहळा, भोपळा, दोडके लावता येतात, तसेच वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी आणि गवार या भाज्‍या आणि पुदीना, मेथी, पालक, चवळई इत्‍यादी पालेभाज्‍याही लावता येतात.’

अग्नीअस्त्र

‘अग्नीअस्त्र’ हे सुभाष पाळेकर कृषी तंत्रातील एक नैसर्गिक कीटक नियंत्रक आहे. पिकांवरील रसशोषक किडी, पाने, शेंगा खाणार्‍या अळ्या यांवर नियंत्रणासाठी अग्नीअस्त्राची फवारणी करतात. हे घरच्या घरी सिद्ध करता येते.

लागवडीला साहाय्यक ठरणारे ओल्या कचर्‍याचे व्यवस्थापन

जीवामृताचा नियमित उपयोग केला, तर या कचर्‍याचे वेगाने विघटन होते अन् कोणतीही दुर्गंधी किंवा माश्या, चिलटे यांच्या उपद्रवाची समस्या निर्माण होत नाही. हा कचरा लागवडीत पसरतांना शक्यतो पालापाचोळ्याच्या आच्छादनावर पसरावा.

वृक्ष हे जणू सत्पुरुषच !

‘वृक्षाः सत्पुरुषा इव ।’ म्हणजे ‘वृक्ष हे जणू सत्पुरुषच आहेत’, असे एक संस्कृत वचन आहे. सज्जनांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्यातील गुणांचा आपल्यावरही प्रभाव पडतो. त्याप्रमाणे झाडांच्या सहवासातही या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो.

झाडांसाठी घरगुती संवर्धक (टॉनिक)

‘नारळातील पाणी (शहाळ्याचे नाही) हे झाडांसाठी उत्तम संवर्धक म्हणून कार्य करते. स्प्रेच्या बाटलीमध्ये हे मिश्रण घालून झाडांवर तुषारसिंचन करावे. झाडाला मोहोर येऊ लागल्यानंतर, फळे धरणे चालू झाल्यावर, तसेच फळांची वाढ होत असतांना अशा निरनिराळ्या अवस्थांमध्ये हे तुषारसिंचन लाभदायक ठरते.’

शेतात रासायनिक खते घालणे हे समष्टी पापच !

‘रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे परिणाम लगेचच दिसून येतात. या परिणामांना शेतकरी भुलतात; मात्र यांचे महाभयंकर दुष्परिणाम लक्षात घेतले जात नाहीत.

झाडांचे नियमित निरीक्षण करावे !

‘झाडांचे नियमितपणे निरीक्षण करणे’, हा लागवड करणार्‍यासाठी आवश्यक गुण आहे. बी पेरल्यानंतर कोणते बी किती दिवसांनी उगवते ? कुठल्या झाडाला किती पाणी लागते ? अशा अनेक गोष्टी निरीक्षणानेच समजतात.