लागवडीला साहाय्यक ठरणारे ओल्या कचर्‍याचे व्यवस्थापन

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘सध्या सर्वत्रच कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर होत चालली आहे. आपल्या स्वयंपाकघरातून प्रतिदिन निघणारा सर्व विघटनशील कचरा लागवडीमध्ये उपयोगात आणून आपण न्यूनतम स्वतःच्या कुटुंबापुरती ओल्या कचर्‍याची समस्या सोडवू शकतो. ‘सुभाष पाळेकर कृषी’ या तंत्राने लागवड करतांना आपण हा कचरा थेट कुंड्यांमध्ये किंवा वाफ्यांमध्ये (लागवडीसाठी बनवलेल्या विटांच्या कप्प्यांमध्ये) पसरून आच्छादन (माती झाकण्यासाठी) म्हणून उपयोगात आणू शकतो. आपल्या लागवडीतून निघणारा पालापाचोळा, सुकलेली झाडे, वेली या सर्वांचाही कुंड्या भरण्यासाठी उपयोग करता येतो. यामुळे मातीतील सेंद्रिय पदार्थांमध्ये वाढ होऊन त्याचा लागवडीला लाभच होतो. जीवामृताचा (देशी गायीचे शेण, गोमूत्र, बेसन आणि गूळ यांपासून बनवलेल्या नैसर्गिक खताचा) नियमित उपयोग केला, तर या कचर्‍याचे वेगाने विघटन होते अन् कोणतीही दुर्गंधी किंवा माश्या, चिलटे यांच्या उपद्रवाची समस्या निर्माण होत नाही. हा कचरा लागवडीत पसरतांना शक्यतो पालापाचोळ्याच्या आच्छादनावर पसरावा. याविषयी अधिक माहितीसाठी यू ट्यूबवरील पुढील माहितीपट पहावा.’

(सौजन्य : Jyoti Shah)

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (२३.११.२०२२)