सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६२
‘थंडीच्या दिवसांत पहाटे दव पडून माती आणि पानेही ओली झालेली असतात. या दिवसांत सकाळी लवकर झाडांना पाणी दिले, तर थंड पाण्याने मातीतील गारवा आणखीनच वाढतो आणि या अतिरिक्त थंडी अन् ओलावा यांमुळे झाडांना अपाय होऊ शकतो. त्यामुळे हिवाळ्यात शक्यतो सूर्योदयानंतर सकाळी १० – ११ वाजेपर्यंत झाडांना पाणी द्यावे.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, फोंडा, गोवा. (०३.१.२०२३)