छतावर फळझाडेही लावता येतात

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम : लेखांक ६३

सौ. राघवी कोनेकर

‘अन्य भाजीपाल्याप्रमाणे विटांच्या वाफ्यात किंवा मोठ्या ड्रममध्ये लिंबू, पेरू, सीताफळ, डाळिंब, चिकू, आंबा इत्यादी फळझाडांची कलमे सहज लावता येतात. झाड वाढल्यानंतर अधून-मधून मोठ्या फांद्यांची छाटणी करत राहिल्यास यांचा आकार मर्यादित रहातो. नियमित जीवामृत देणे, पालापाचोळ्याचे आच्छादन करणे (भूमी झाकणे) अशी काळजी नियमित घेतल्यास साधारण एक ते दीड वर्षात या झाडांना फळधारणा होऊ लागते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (३.१.२०२३)