वृक्ष हे जणू सत्पुरुषच !

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘वृक्षाः सत्पुरुषा इव ।’ म्हणजे ‘वृक्ष हे जणू सत्पुरुषच आहेत’, असे एक संस्कृत वचन आहे. सज्जनांच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. त्यांच्यातील गुणांचा आपल्यावरही प्रभाव पडतो. त्याप्रमाणे झाडांच्या सहवासातही या सर्व गोष्टींचा अनुभव घेता येतो. ज्याप्रमाणे एखाद्या सत्पुरुषाचे संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी असते, त्याप्रमाणे झाडेही इतरांसाठी जगतात. स्वतःची पाने, फुले, फळे आणि सावली दुसर्‍यांना देतात. झाडांच्या या गुणांमुळे त्यांच्या सान्निध्यात आपल्यातील निराशा आणि नकारात्मकता चटकन निघून जाते. लागवडीत सेवा करतांना निसर्गदेवतेच्या रूपातील भगवंताला अनुभवता येते.’

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (९.११.२०२२)