उन्हाच्या आवश्यकतेचा विचार करून कुंड्यांची रचना करा !
निरनिराळ्या रोपांना असलेली उन्हाची आवश्यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.
निरनिराळ्या रोपांना असलेली उन्हाची आवश्यकता लक्षात घेऊन कुंड्यांची रचना केल्यास ते अधिक लाभदायक होऊ शकते.
प्रत्येक घरात जसे तुळशीचे रोप असते, तशीच नागवेलही असायला हवी. केवळ खाण्यासाठीच नव्हे, तर आपल्या प्रत्येक धार्मिक सण-समारंभामध्ये विड्याच्या पानांची आवश्यकता असते
‘फेब्रुवारी ते एप्रिल हा पुदिना लागवडीसाठी उत्तम कालावधी ! पावसाळ्यातही याची लागवड करता येते. बियाण्यांच्या दुकानात पुदिन्याच्या बिया मिळतात; परंतु घरगुती लागवडीसाठी याच्या काड्यांपासून लागवड करणे अधिक सोपे जाते. हे अल्प व्ययातही होते.
साधारणपणे जेव्हा एकाच जागेत किंवा एकमेकांजवळ दोन पिके एकाच वेळी घेतली जातात, तेव्हा ती एकमेकांना त्रासदायक न ठरता साहाय्य करणारी असावी लागतात.
कीटक दिसल्यावर प्रत्येक वेळी ‘त्यांना घालवण्यासाठी काय फवारावे ?’, असा विचार करू नये. काही कीटक हे ‘मित्र कीटक’ असतात. ‘जीवो जीवस्य जीवनम् ।’ म्हणजे ‘एक जीव दुसर्या जिवाचे जीवन आहे’, या न्यायाने ‘निसर्गात प्रत्येक जिवाला काहीतरी कार्य सोपवलेले आहे’, हे लक्षात घ्यायला हवे.’
गोमूत्र कितीही जुने असले, तरी चालते. त्यामुळे आपल्या लागवडीच्या क्षेत्रानुसार गोमूत्राचा साठा करून ठेवल्यास वारंवार गोमूत्र आणण्याची आवश्यकता रहात नाही.
वेलवर्गीय भाज्यांच्या बिया मातीत थेट न पेरता आधी माती घातलेल्या कागदी कपांत प्रत्येकी १ बी लावून रोपे सिद्ध करावीत. रोपे सिद्ध झाल्यावर त्यांची वाफ्यांत किंवा मोठ्या कुंड्यांत लागवड करावी. हे अधिक सोपे आणि सोयीचे होते.
खरेतर ‘आहार हेच औषध’, असे म्हणणे सध्या कठीणच वाटते; परंतु आपल्या घरच्या लागवडीत पिकवलेला विषमुक्त भाजीपाला मात्र निश्चितपणे औषधाचे काम करू शकतो. आजपासूनच आपल्या नित्य आहारातील न्यूनतम काही गोष्टी तरी स्वतःच पिकवण्यासाठी कृतीशील होऊया.
‘जीवामृत सिद्ध करण्याची कृती आपण याआधीच्या लेखांतून समजून घेतलेली आहे. आता त्यासंबंधी अन्य सूत्रे जाणून घेऊ.
द्विदल पिकांमुळे भूमीमध्ये नत्राचा (नायट्रोजनचा) पुरवठा होतो. आपल्याकडील जागेच्या उपलब्धतेनुसार आपण एकदल पिकांसोबत पुढील द्विदल पिकांची लागवड करू शकतो.