मातीतील सूक्ष्म जिवाणूंचे महत्त्व

झाडासाठी आवश्यक असलेले मातीतील आणि हवेतील सर्व घटक मुळांना शोषून घेता येतील, अशा स्वरूपात परिवर्तित करून पुरवण्याचे कार्य जिवाणू करतात. भूमीतील जिवाणूंची संख्या आणि कार्य जितके अधिक, तितकी मातीची सुपिकता अधिक असते.

दुहेरी लाभ देणारी लसूण लागवड

मातीमध्ये ३ – ३ इंच अंतरावर बोटाने छिद्र करून एकेक पाकळी खोचावी. खोचतांना पाकळीचे शेंड्याकडील टोक वरच्या दिशेने असावे. वाफ्याच्या कडेने किंवा कुंडीत अगोदर लावलेल्या झाडाच्या बाजूने लसूण लावता येते. असे केल्याने लसणीच्या उग्र वासाने कीटक मुख्य पिकाजवळ येत नाहीत.

स्वतःच्या घरी झालेला भाजीपाला हा सर्वार्थाने उत्कृष्ट आहार !

‘उत्तम आहार कसा असावा?’, याचे निकष सांगतांना ‘तो Regional (आपल्या प्रदेशात उत्पन्न झालेला), Seasonal (ऋतुनूसार उत्पन्न झालेला), Original (नैसर्गिकपणे उत्पन्न झालेला) असावा’, असे म्हटले जाते. आपल्या घरच्या लागवडीतील पिके वरील तीनही निकष पूर्ण करतात.

कोणत्या झाडाला किती आणि कधी पाणी द्यावे ?

पावसाळ्यामध्ये पाणी देण्यावर आपले नियंत्रण नसते; परंतु अन्य ऋतूंमध्ये पुष्कळ वेळा झाडांच्या मुळांना आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात दिलेले पाणी, हे रोपे मरून जाण्याचे कारण असते.

तण काढून टाकून भूमी स्वच्छ करू नका !

तणाची मुख्य पिकासमवेत मातीतील अन्नद्रव्ये घेण्यासाठी स्पर्धा होत नाही; उलट तण सजीव आच्छादनाचे कार्य करते. तणाची उंची अधिक झाल्यास त्याची छाटणी करून त्याच ठिकाणी आच्छादन म्हणून पसरून घालावे.

वांगी, मिरची आणि टोमॅटो यांसारखे लहान बी लावतांना कोणती काळजी घ्यावी ?

‘वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी आणि फ्लॉवर यांचे बी पुष्कळ लहान असते. त्यामुळे ते थेट कुंडी किंवा वाफा यांमध्ये लावू नये. त्या आधी त्यांची रोपे सिद्ध करून घ्यावीत.

‘सापळा पीक’ म्हणजे काय ?

अशा प्रकारे लागवड केल्याने कीड दुसर्‍या पिकाकडे आकर्षित होते आणि मुख्य पिकाचे रक्षण होते. मोहरी आणि चवळी ही सापळा (Trap) पिकाची उदाहरणे आहेत.

झेंडूच्या रोपांची लागवड करण्याचे महत्त्व

काही वेळा वांगी, कोबी अशा भाज्यांच्या मुळांवर लहान गाठी दिसतात. या सूत्रकृमींच्या गाठी असतात. हे कृमी भाज्यांच्या मुळांतून रस शोषून रोपाला हानी पोचवतात. या कृमींचा नाश करणारे १ औषधीतत्त्व झेंडूच्या मुळांमधून स्रवते आणि सूत्रकृमींचे नियंत्रण करते.

शेतकर्‍याचे कष्ट लक्षात येण्यासाठी एकदा तरी घरी लागवड करून पहा !

‘शेतकरी शेतात किती परिश्रम करत असेल ?’, याची कल्पना येऊन प्रतिदिन ताटात वाढल्या जाणार्‍या अन्नाकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. आपोआपच आपल्याकडून अन्न वाया घालवले जात नाही !’

नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

‘नैसर्गिक शेतीमध्ये उत्पन्न अधिक येत नाही. असा अपप्रचार आणि त्याचे केलेले खंडण !