शिकण्याची वृत्ती अन् सेवेची तीव्र तळमळ असल्याने मनापासून सेवा करणारी रामनाथी आश्रमातील कु. साधना पाटील !

आज साधिका कु. साधना पाटील हिचा चैत्र शुक्ल पक्ष चतुर्थीला वाढदिवस आहे. त्या निमित्ताने आश्रमातील सहसाधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात मंगलमय वातावरणात गुढीपूजन !

सनातनच्या आश्रमात १३ एप्रिल २०२१ या दिवशी गुढीपूजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी मंगलमय वातावरणात विधीवत् गुढीपूजनानंतर पंचांगस्थ गणपतिपूजन आणि नूतन संवत्सरफलश्रवण (नवीन वर्ष कसे असेल, याची ज्योतिषशास्त्रदृष्ट्या माहितीचे श्रवण) करण्यात आले.

श्री भवानीदेवीच्या शोभायात्रेची ध्वनीचित्र-चकती पहातांना देवीतत्व जागृत झाल्याचे वाटून शक्ती अनुभवता येणे आणि कृतज्ञताभाव जागृत होणे

शोभायात्रेतील वाद्यांतून निर्माण होणारी नादशक्ती, साधकांमधील भाव, देवीमधील चैतन्यशक्तीचा स्रोत यांमुळे वातावरण पालटून गेल्याचे दिसत होते.

श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’

भाग्यनगर, तेलंगाणा येथील कोटा हनुमंत कुमार यांना रामनाथी आश्रमभेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

‘सनातन संस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या रामनाथी आश्रमात येणे, हीच एक महत्वपूर्ण गोष्ट असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने मी धन्य झालो.

सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई यांच्या सेवेत असतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे आणि येणार्‍या अनुभूती

फाल्गुन कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.४.२०२१) या दिवशी रामनाथी आश्रमात रहाणारे सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई ८१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

आकाशातील रंग पहातांना मन शांत होणे, आकाशात अनेक ऋषी दिसून काही क्षणांतच ते अंतर्धान पावणे, नंतर १ घंटा गारवा जाणवणे

‘१६.५.२०१५ या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता आश्रमातील साधकांना आकाशातील रंग पहायला सांगितले होते. ते पहात असतांना माझे मन शांत झाले. ‘काही क्षण फिकट गुलाबी रंग, तर काही वेळाने सर्वत्र केवळ पांढरा रंग व्यापला आहे’, असे मला जाणवले.

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘महाचंडी यागा’च्या वेळी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

महाचंडी यागाला प्रारंभ झाल्यावर यज्ञस्थळी ठेवण्यात आलेली योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी आशीर्वादस्वरूप दिलेली श्री दुर्गादेवीची अष्टभुजा मूर्ती सूक्ष्मातून यज्ञकुंडाच्या मध्यभागी स्थिर झालेली मला दिसली.

संगीतातील विविध प्रयोगांच्या वेळी जाणवलेली सूत्रे

रामनाथी आश्रमातील पुरोहित साधक यांनी म्हटलेली विष्णुस्तुती यांच्या ध्वनीफिती आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना ऐकवण्यात आल्या. ‘त्याचा त्या साधकांवर काय परिणाम होतो ?’, याचा अभ्यास करण्यात आला.

कर्नाटक येथील एका संतांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

आपल्याला हिमालयात जाऊन तपश्‍चर्या करण्याची आवश्यकता नाही. भावपूर्ण गुरुसेवा केल्यास हिमालयात जाऊन तपश्‍चर्या केल्याचे फळ प्राप्त होऊ शकते.