भाग्यनगर, तेलंगाणा येथील कोटा हनुमंत कुमार यांना रामनाथी आश्रमभेटीच्या वेळी जाणवलेली सूत्रे

१. सनातनच्या रामनाथी आश्रमात आल्यावर ‘देवभूमीवर आलो आहे’, असे वाटणे : ‘सनातन संस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या रामनाथी आश्रमात येणे, हीच एक महत्वपूर्ण गोष्ट असून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने मी धन्य झालो. तेथील धार्मिक वातावरणाने मनाला प्रसन्नता वाटली आणि ‘जणू काही देवभूमीवर आलो आहे’, असे वाटले.

२. ‘सनातन संस्थेत दिल्या जाणार्‍या शिक्षणाने संस्कार, संस्कृती, धर्माचरण आणि धर्महितार्थ जीवन अर्पण करण्याची प्रेरणा मिळते’, असे माझ्या लक्षात आले.

३. हनुमानाला तन, मन आणि जीवन यांत भगवान श्रीराम दिसत होते, तसेच सनातन संस्थेच्या साधकांमध्ये तन, मन अर्पून कार्य करतांना धर्म आणि हिंदुत्वनिष्ठता दिसून येते.

४. ‘धर्म आणि अध्यात्म यांचे प्रतिरूप असलेल्या सनातन संस्थेशी जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती साधनेचे लक्ष्य साधण्यात मग्न झाली आहे’, असे जाणवले.

५. हिंंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी विभिन्न क्षेत्रांच्या ठिकाणी होत असलेले संस्थेचे प्रयत्न पुष्कळ प्रशंसनीय आहेत. अशा महान संस्थेच्या परिवारातील सदस्य होणे, हे श्री. सीतारामय्या (माझे काका) यांचे भाग्य आहे.

– श्री. कोटा हनुमंत कुमार, भाग्यनगर, तेलंगाणा. (श्री. सीतारामय्या यांच्या धाकट्या भावाचे सुपुत्र आहेत.)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक