श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे आई-वडील) यांना रामनाथी आश्रमात आलेल्या अनुभूती

श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे

१. चंदन आणि उद यांचा सुगंध येणे

सौ. वैदेही गौडा

अ. ‘एकदा माझे आजी-आजोबा (श्री. प्रभाकर पिंगळे आणि सौ. कमलिनी पिंगळे) रामनाथी आश्रमातील धान्य निवडण्याच्या ठिकाणी असलेल्या आगाशीत बसले होते. तेव्हा त्यांना चंदनाचा सुगंध येत होता. ‘तो सुगंध कुठून येत आहे ?’, हे त्यांना कळत नव्हते. त्यांनी अन्य साधकांना विचारले, ‘‘तुम्हाला कुठल्या लाकडाचा सुगंध येत आहे का ?’’ तेव्हा साधकांनी त्यांना ‘नाही’, असे सांगितले.

आ. त्या दिवशी आश्रमात बगलामुखीदेवीचा याग झाला. तेव्हा आजी यज्ञस्थळी बसली होती. त्या वेळी तिला चंदनाचा सुगंध येत होता. ‘मला यज्ञाच्या ठिकाणी चंदनाचा सुगंध येत होता’, असे आजी खोलीत आल्यावर आजोबांना सांगत होती. तेव्हा आजोबांनाही चंदनाचा सुगंध आला.

इ. आजी-आजोबा रहात असलेल्या खोलीत गुरुवारी भ्रमणभाषवर भावसत्संग लावला होता. तेव्हा आजोबा झोपले होते. ते अकस्मात् उठून बसले आणि म्हणाले, ‘‘मला उदाचा सुगंध येत आहे.’’ नंतर त्यांना झोप लागली. काही वेळाने ते उठून म्हणाले, ‘‘मला अत्तराचा घमघमाट येत आहे.’’

२. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी यज्ञात आहुती दिल्यावर निर्माण झालेल्या ज्वाळा वेगळ्याच प्रकारच्या आहेत’, असे आजीला जाणवणे

रामनाथी आश्रमात होत असलेल्या बगलामुखी यज्ञाच्या ठिकाणी आजी बसली होती. त्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी हिना अत्तराची आहुती दिली. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आहुती दिल्यावर निर्माण झालेल्या ज्वाळा वेगळ्याच आहेत’, असे आजीला जाणवले.’

– सौ. वैदेही गौडा (नात), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक