‘१६.५.२०१५ या दिवशी सायंकाळी ७.१० वाजता आश्रमातील साधकांना आकाशातील रंग पहायला सांगितले होते. ते पहात असतांना माझे मन शांत झाले. ‘काही क्षण फिकट गुलाबी रंग, तर काही वेळाने सर्वत्र केवळ पांढरा रंग व्यापला आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मी प्रार्थना करण्यासाठी हात जोडले; परंतु त्यात काहीच शब्द नव्हते. ‘त्या वेळी आकाश पांढर्या रंगाने प्रकाशमान झाले असून अनेक ऋषी आश्रमाच्या वरच्या बाजूला गोलाकार बसले आहेत’, असे मला दिसले. ‘ऋषी ध्यानस्थ बसले नव्हते; पण त्यांनी डोळे मिटले होते. त्यांनी डोळे उघडले आणि काही क्षणांतच ते अंतर्धान पावले. तेव्हा ‘जणू काही त्या ऋषीमुनींनाच नमस्कार करण्यासाठीच हात जोडले गेले’, असे मला जाणवले. त्यानंतर १ घंटा माझ्या शरिराच्या आसपास गार वार्याची झुळूक स्पर्श करून गेल्याप्रमाणे मला गारवा जाणवत होता.’ – होमिओपॅथी वैद्या (कु.) आरती तिवारी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |