कर्नाटक येथील एका संतांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधनेविषयीची सूत्रे

अ. आपल्याला हिमालयात जाऊन तपश्‍चर्या करण्याची आवश्यकता नाही. भावपूर्ण गुरुसेवा केल्यास हिमालयात जाऊन तपश्‍चर्या केल्याचे फळ प्राप्त होऊ शकते.

आ. जो शिष्य गुरूंची सेवा करतो, त्याच्या जन्माचे सार्थक होते. असे साधक कुठेही असले, तरी गुरु त्यांचे रक्षण करतात.

इ. ध्यानाच्या उच्च अवस्थेत माझा श्‍वासोच्छ्वास बाहेरून नाकाने नव्हे, तर आतून चालू असतो.

ई. ब्रह्मा, विष्णु, महेश्‍वर आणि जगन्माता हे विश्‍वाचे रक्षण करतात. ‘लोकांनी धर्माच्या मार्गाने चालावे (धर्मपालन करावे)’, यासाठी श्रीविष्णु मार्गदर्शन करत असून तो लोकांचे पालन-पोषण करतो. या कार्यात श्री गुरु आणि जगन्माता तत्पर आहेत.

उ. संपूर्ण विश्‍व शिवमय आहे.

ऊ. काही जणांमध्ये अंतर्यामी आत्म्याशी अनुसंधान साधण्यासाठी आवश्यक असलेली ओढ अल्प असते.

ए. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे अनुक्रमे ब्रह्मा, विष्णु अन् शिव यांचे कार्य आहे.

ऐ. गुरूंमध्ये भेद नसतो. शिष्या-शिष्यामध्ये भेद असतो. हा भेद जेव्हा निघून जाईल, तेव्हा ‘हिंदु राष्ट्र’ येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः प्रणाम !’

– एक संत, कर्नाटक (डिसेंबर २०१९)

२. आगामी काळाविषयी सांगितलेली सूत्रे

अ. पापभिरू आणि साधना करणारे लोकच जिवंत रहातील.

आ. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सर्व जण एकत्र येऊन हातभार लावतील. येणार्‍या काळात केवळ धार्मिक व्यक्तीच जिवंत रहातील. या धार्मिक व्यक्तींचे रक्षण ईश्‍वरच करणार आहे.

इ. दोन माळ्यांपेक्षा अधिक माळे असलेल्या इमारती कोसळतील.

ई. धर्मस्थापनेसाठी लाखो व्यक्ती आजमितीला आहेत. तेहतीस कोटी देवतांपैकी लाखो देवता अगोदरच साधक आणि संत यांच्या रूपात भूतलावर आहेत.

उ. संपूर्ण जगात (विश्‍वात) हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी व्यक्तींची आवश्यकता आहे. थोड्या कालावधीतच याविषयीचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर येईल.

ऊ. ऋषिमुनी, योगी आणि सिद्ध हे कार्यसिद्धीसाठी अज्ञात रूपात सज्ज आहेत. ही सर्व भगवंताची लीला आहे. हिमालयातील योगी केरळ आणि तमिळनाडू येथे येऊन स्थायिक होतील. थोर योगी विद्या शिकवण्यासाठी येतील.

ए. भविष्यकाळात विमानप्रवासाची सुविधा नसेल.

ऐ. रामनाथी आश्रमात जे चालू आहे, ते देवदेवता पहात आहेत. (‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक आणि संत कार्यरत आहेत.’ – संकलक)

ओ. जेव्हा गुरु क्रोधित होतात, तेव्हा प्रकृतीमाता तांडव करते आणि पृथ्वीवरील लयाच्या प्रक्रियेत साहाय्य करते.

क. भारतात हिंदु राष्ट्र येईल. आता हिंदूसंघटनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

३. कोरोनासंदर्भात सांगितलेली सूत्रे

अ. ‘सध्या ‘कोरोना विषाणूं’च्या संसर्गाने जगभरात जो हाहाःकार माजला आहे, त्यातून लोक ईश्‍वराला शरण जातील. ज्या लोकांचा भगवंतावर विश्‍वास आहे, ते लोक धर्माचरण करण्यास प्रवृत्त होतील. ज्यांचा भगवंतावर विश्‍वास नाही, त्यांच्यासाठी काळ पुष्कळ कठीण असेल.

आ. सध्या ‘कोरोना विषाणूं’च्या संसर्गाने जगभरात जो हाहाःकार माजला आहे, ती सर्व भगवंताचीच लीला आहे. त्यामुळे यातून स्वतःला वाचण्यासाठी लोकांनी ‘भगवंताची भक्ती वाढवणे, त्याला शरण जाणे’, हाच एकमेव पर्याय आहे.’

– एक संत, कर्नाटक (११.४.२०२०)