पू. भार्गवराम प्रभु (वय ६ वर्षे) यांना असलेली रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची ओढ !

सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम यांच्या शाळेला २ दिवसांची सुटी असली, तरीही ते विचारतात, ‘‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जायचे का ?’’ ते प्रत्येक सुटीत रामनाथी आश्रमात जातात.

शिबिरासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर सौ. मंगला पांडे यांना आलेल्या अनुभूती

नामजप करतांना मला गुरुमाऊलीचे विशाल चरण दिसून सगळीकडे चैतन्य जाणवू लागले आणि नंतर मला माझे शरीर हलके जाणवू लागले. मन निर्विचार होऊन माझा नामजप एकाग्रतेने होऊ लागला.

लुधियाना, पंजाब येथील सौ. माधवी प्रमोद शर्मा यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील दीपोत्सवाच्या छायाचित्राचे दर्शन घेतांना मला वाटले, ‘तेथे जणू काही नारंगी रंगाचा सूर्य आहे. हा सूर्य कलियुगातील अंधकार दूर करत चैतन्यरूपी किरणांनी संपूर्ण ब्रह्मांडात हिंदु धर्माचे चैतन्य प्रक्षेपित करत आहे.

सातारा येथील कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त) (वय ७४ वर्षे) यांना रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर जाणवलेले सूत्र आणि आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती 

खरोखरच आज भारत देश आणि हिंदु धर्म यांच्यावर संकटे आली आहेत. यासाठीच श्रीकृष्णस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी अवतार घेतला आहे.

जळगाव येथील साधिका सौ. जयश्री पाटील यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात जाण्यासाठी निघतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांनी रामनाथी आश्रमात पोचल्यावर अनुभवलेली भावस्थिती !

साधक सेवा करत असतांना मला ‘प्रत्येक साधकाच्या अंतरात गुरुकृपेची पुष्कळ तळमळ आहे. ती तळमळ त्यांना सेवा करण्याचे बळ देत आहे’, असे वाटून पुष्कळ शिकायला मिळत होते.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील सामवेदी कार्तिक जोशी यांच्याकडून ‘सामगान’

सनातन संस्था ही एकमात्र अशी संस्था आहे, जिच्याविषयी माझ्या मनात श्रद्धा, प्रेम, आनंद आणि अभिमान आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देण्याचे कार्य वैदिक, पुरोहित आणि ब्राह्मण यांच्यासह सनातन संस्थाही करत आहे, असे कौतुकोद्गार सामवेदी कार्तिक जोशी यांनी काढले.

नागपूर येथील कु. श्रीवल्लभ जोशी (वय १५ वर्षे) याला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आलेल्या अनुभूती

मी भवानीमातेचे दर्शन घेतल्याचा दुसर्‍या दिवशी सायंकाळी आश्रमात बासरी वाजवत असतांना माझ्या बोटाला कुणाचा तरी स्पर्श जाणवला आणि ‘तिच शक्ती माझ्याकडून बासरी वाजवून घेत आहेत’, असे मला वाटले. बासरी वाजवून झाल्यावर मला समजले की, ‘माझ्याकडून एक नवी धून त्या शक्तीने सिद्ध करून घेतली आहे.’

सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे !

श्री. दादा वेदक यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील स्वच्छता आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे.

डोंबिवली, ठाणे येथील तबलावादक श्री. योगेश सोवनी यांना रामनाथी आश्रमात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात प्रवेश करताच श्री सिद्धिविनायकाचे तेजोमय दर्शन होऊन डोळ्यांचे पारणे फिटणे

हनुमान जयंतीच्या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. संकेत भोवर यांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य !

‘६.४.२०२३ या हनुमान जयंतीच्या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील मारुतिरायाच्या मूर्तीला प्रार्थना केली आणि मी डोळे मिटल्यावर मला दिसले, ‘मारुतिराया गदा खांद्यावर घेऊन मंदिराच्या भोवती ‘राम राम’ म्हणत प्रदक्षिणा घालत आहे.’…