‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ व्या वाढदिवसानिमित्त दाखवण्यात येत असलेल्या कार्यक्रमात श्री भवानीदेवीची मूर्ती रामनाथी आश्रमात येतांना काढलेल्या शोभायात्रेची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. तेव्हा शोभायात्रेतील वाद्यांतून निर्माण होणारी नादशक्ती, साधकांमधील भाव, देवीमधील चैतन्यशक्तीचा स्रोत यांमुळे वातावरण पालटून गेल्याचे दिसत होते. ते पहातांना मला आध्यात्मिक लाभ होऊन माझी भावजागृती होत होती. संपूर्ण वातावरण चैतन्यमय आणि आनंदी झाले होते. त्या वेळी देवीचे तत्व जागृत झाल्याचे जाणवून मला शक्ती अनुभवता आली.
त्या वेळी सर्व साधक, संत आणि सद्गुरु यांनी भावमय होऊन व्यक्त केलेली कृतज्ञता आम्हा सर्व साधकांना भावाच्या एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली.’
– श्री. राजेंद्र नारायण सांभारे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.५.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |