सातारा येथील शिवतीर्थावर ३५२ वा ‘शिवप्रतापदिन’ उत्साहात साजरा

शिवतीर्थावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून पूजन करण्यात आले.

किल्ले वासोटा ३ दिवस पर्यटनासाठी बंद

महाराष्ट्रातील शूरवीरांच्या पराक्रमाचे प्रतिक असलेले किल्ले ख्रिस्ती सणाला पर्यटक करत असलेल्या मौजमजेसाठी बंद ठेवावे लागणे हे दुर्दैवी !

बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधीवरील छताचा लोकार्पण सोहळा पार पडला !

विशाळगड येथे ३६० वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत उघड्यावर असलेल्या वीररत्न बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीवर सह्याद्री प्रतिष्ठानच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने छत उभारण्यात आले आहे.

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज यांचे काम लवकरच चालू होणार ! – खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

शिवछत्रपतींनी पुनर्बांधणी करून घेतलेल्या आणि मराठा आरमाराच्या प्रमुख शक्तीकेंद्रापैकी एक असलेल्या ‘विजयदुर्ग’ किल्ल्याची तटबंदी अन् बुरुज यांचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आले होते. याचे काम लवकरच चालू होणार असल्याचे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

शिवसेना शाखा क्रमांक १ आणि पैलवान विशालसिंग राजपूत मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित किल्ला स्पर्धेचे पारितोषिक वितरण

कोरोनाची महामारी चालू असतांना त्या त्या भागात जाऊन किल्ला स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याविषयी शिवसेनेचे आयोजकIनी कौतुक केले.

तमिळनाडू येथील जिंजी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५० लाख रुपये घोषित

स्वराज्याच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असणार्‍या जिंजी किल्ल्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असतांना त्यांनी जिंजी किल्ल्यावर ताबा मिळवला होता.

वर्ष २०२१ ची गडकोट मोहीम अर्थात् धारातीर्थ यात्रा पन्हाळगड ते विशाळगड अशी होणार

छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतिवर्षी धारातीर्थ यात्रा आयोजित केल्या जातात.

हिंदवी स्वराज्य समूहाच्या वतीने तालुकास्तरीय किल्ला स्पर्धांचे बक्षीस वितरण 

प्रथम क्रमांकाचे बक्षीस मोठ्या गटात छत्रपती शिवाजी महाराज चौक (राजगड) आणि विश्‍वजीत पाटील (राजगड) यांना देण्यात आले.

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे आयोजन

मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.

कोल्हापूरच्या गिर्यारोहकांचे लिंगाणा सुळक्यावर यशस्वी आरोहण !

३ सहस्र १०० फूट उंचीच्या शिवलिंगाच्या आकाराचा अतीदुर्गम असा कातळकडा म्हणजेच गिरीदुर्ग लिंगाणा कोल्हापूरच्या गिर्यारोहकांनी यशस्वीरित्या सर केला.