गोवा प्रशासनाला लज्‍जास्‍पद !

‘गोवा मुक्‍तीलढ्यात सहभागी झालेल्‍या अनेक स्‍वातंत्र्यसैनिकांना आग्‍वाद किल्‍ल्‍यात कारावासाची शिक्षा झालेली आहे, तसेच शिक्षा भोगतांना अनेकांचे प्राणही गेले आहेत. अशा ऐतिहासिक गडाचे गोवा सरकारने संग्रहालयात रूपांतर केले आहे. या संग्रहालयात फिरते मद्यविक्री केंद्र उघडल्‍याचे वृत्त समोर आल्‍यावर या विरोधात स्‍वातंत्र्यसैनिक संघटना, स्‍वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, राष्‍ट्रप्रेमी नागरिक यांच्‍याकडून रोष व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍यावर गडाच्‍या संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.’ (२२.२.२०२३)