महामोर्च्यात सहभागी होण्याचे आणि विधीमंडळात विषय उपस्थित करण्याचे आमदारांचे आश्वासन !
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – येथे ३ मार्च या दिवशी दुपारी १२ वाजता ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी बंदरे आणि खनिज मंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदारांची भेट घेऊन त्यांना मोर्च्याचे निमंत्रण दिले.
या वेळी सर्वांनी या महामोर्च्यामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले, तसेच काही आमदारांनी ‘गड-दुर्ग यांच्या रक्षणाचा विषय विधीमंडळात उपस्थित करू’, तर काहींनी ‘गड-दुर्ग रक्षण महामंडळ स्थापन करण्याची मागणी करू’, असे आश्वासन दिले.
या आमदारांना देण्यात आले महामोर्च्याचे निमंत्रण !
या महामोर्च्याचे निमंत्रण भाजपचे आमदार अतुल भातखळकर, आमदार विजयकुमार देशमुख, निरंजन डावखरे, मंगेश चव्हाण, श्रीकांत भारतीय, आकाश फुंडकर, डॉ. संदीप धुर्वे, सौ. सीमाताई हिरे, महेश लांडगे, शिवेंद्रराजे भोसले, भाजपचे माजी मंत्री परिणय फुके, जयकुमार रावल; ठाकरे गटाचे आमदार रमेश कोरगावकर, वैभव नाईक, सुनील प्रभु; शिवसेनेचे आमदार सुहास कांदे; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके आदींना देण्यात आले.