वाहनांच्‍या विशेष पडताळणी मोहिमेत २६ वाहनांविरुद्ध कारवाई !

समृद्धी महामार्गावर २५ प्रवाशांचे बळी घेणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सच्‍या अपघातानंतर ९ जुलैच्‍या रात्री त्‍या महामार्गासह अन्‍य ३ मार्गांवर वाहनांची विशेष पडताळणी मोहीम राबवण्‍यात आली.

बसचालक शेख दानिश मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याने अपघात घडल्‍याची शक्‍यता !

प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्‍यामुळे अपघात झाला का ?’, याचे अन्‍वेषण केले. त्‍यासाठी टायरच्‍या खुणा आणि नमुनेही पडताळण्‍यात आले; पण रस्‍त्‍यावर टायर फुटल्‍याच्‍या कोणत्‍याही खुणा आढळल्‍या नाहीत.

‘कदंब’ बसगाड्यांवरील पानमसाल्याची विज्ञापने हटवणार ! – कदंब महामंडळ

कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.

अपघातग्रस्‍त बसच्‍या विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सवर आतापर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड

संबंधित बस आस्‍थापनाने अनेक वेळेला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी त्‍यांना दंड झाला आहे; मात्र कधीही तो दंड भरलेला नाही. अपघात झाल्‍यानंतर मात्र अवघ्‍या काही घंट्यांत सर्व दंड ‘ऑनलाईन’ भरण्‍यात आले.

गोव्यात मागील ६ मासांत ४ सहस्र ७०० हून अधिक वाहनधारकांची अनुज्ञप्ती तात्पुरती रहित

दंड वाढवूनही नागरिक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, याचाच अर्थ नागरिकांमध्ये नीतीमत्ता नाही. त्यामुळे शालेय शिक्षणापासूनच नीतीमूल्यांचे शिक्षण आणि साधना शिकवणे आवश्यक !

गोवा : कदंब महामंडळाच्या बसवर असलेल्या गुटख्याच्या विज्ञापनांना ३५० शिक्षकांचा आक्षेप !

एका शिक्षकाचे म्हणणे होते, ‘‘मुलांच्या भवितव्यापेक्षा या विज्ञापनांतून मिळणारी रक्कम मोठी नाही‘‘. याचप्रमाणे कॅसिनो जुगार आणि सनबर्न संगीत महोत्सव यांमुळे होणारी भावी पिढीची हानी पहाता त्यातून मिळणार्‍या महसुलाला काहीच किंमत नाही !

सातारा येथे वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलीस कर्मचार्‍याला मारहाण !

येथील यशवंतराव चव्हाण विज्ञान महाविद्यालयासमोर (वाय.सी. कॉलेजसमोर) वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचार्‍यास अज्ञातांनी लाकडी दांडके आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली.

बकरी ईदच्‍या पार्श्‍वभूमीवर जनावरांच्‍या वाहतुकीच्‍या संदर्भातील नियमांचे पालन करावे ! – पुण्‍याचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी

जनावरांची वाहतूक करण्‍यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्‍या बांधणीमध्‍ये सुयोग्‍य पालट करून नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना प्राप्‍त करून घेणे बंधनकारक आहे

कायद्याचे उल्लंघन करणार्‍या दोषी वाहनधारकांकडून ६८ लाख ५९ सहस्र ३६६ रुपयांचा दंड वसूल !

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या वतीने १ ते ३१ मे या कालावधीत मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणार्‍या ५ सहस्र ६८९ दोषी वाहनांवर कारवाई करण्‍यात आली आहे.

राज्यात १ सहस्र ४ अपघातप्रवण क्षेत्रे आढळली !

राज्यातील विविध रस्त्यांवर १ सहस्र ४ ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्रे (ब्लॅकस्पॉट) आढळून आली आहेत. यासंदर्भातील सूची नुकतीच परिवहन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिली