अधिक बसभाडे आकारणार्‍या १२ खासगी बसगाड्यांवर दंडात्‍मक कारवाई !

मागील ३ दिवसांपासून प्रादेशिक परिवहन विभागाने (आर्.टी.ओ.) महामार्गावर खासगी बसची पडताळणी चालू केली आहे. यात २७ बसगाड्यांपैकी १२ बसधारक अतिरिक्‍त भाडे आकारणी करत असल्‍याचे निदर्शनास आले.

खासगी ट्रॅव्‍हल्‍सच्‍या विरोधातील तक्रारीसाठी स्‍वतंत्र ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक द्यावा !

बसस्‍थानके, खासगी ट्रॅव्‍हल्‍स आणि त्‍यांची तिकीट विक्री केंद्रे यांवर तक्रारीसाठी असलेला ‘हेल्‍पलाईन’ क्रमांक ठळकपणे लावण्‍यात यावा. ‘ट्‍विटर’, ‘फेसबूक’ आदी सामाजिक माध्‍यमांद्वारे याविषयी जागृती करावी’, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली आहे.

सातारा येथे १५० हून अधिक बसचालकांची आरोग्य आणि नेत्र तपासणी !

येथील प्रादेशिक परिवहन विभाग आणि क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १५० हून अधिक बसचालकांची आरोग्य आणि नेत्र तपासणी करण्यात आली.

१०४ वाहनचालकांपैकी ७४ जणांची दृष्‍टी सदोष !

पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या माध्‍यमातून तळोजा ब्रेक टेस्‍टिंग ट्रॅक येथे ‘रस्‍ता सुरक्षा अभियाना’च्‍या अंतर्गत वाहनचालकांचे नेत्र तपासणी आणि आरोग्‍य तपासणी शिबिर घेण्‍यात आले.

गोव्यात ‘उबेर’ टॅक्सीसेवेला अनुमती देणार नाही ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

‘उबेर’ या  ‘ॲप’च्या माध्यमातून ‘टॅक्सी’सेवा देणार्‍या आस्थापनाने हल्लीच गोव्यात काही निवडक मार्गांवर ‘टॅक्सी’ सेवेला प्रारंभ केल्याचे वृत्त असल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुदिन्हो यांनी ही माहिती दिली.

ट्रॅव्‍हल्‍समधील प्रवाशांचे संपूर्ण नाव आणि पत्ता नसल्‍यास होणार कठोर कारवाई !

प्रवासाचे आरक्षण करतांना प्रवाशांचे संपूर्ण नाव, पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक नमूद असावेत. यात त्रुटी आढळून आल्‍यास कठोर कारवाई करण्‍याची सूचना प्रशासनास देण्‍यात आली आहे.

वाहनांच्‍या विशेष पडताळणी मोहिमेत २६ वाहनांविरुद्ध कारवाई !

समृद्धी महामार्गावर २५ प्रवाशांचे बळी घेणार्‍या ट्रॅव्‍हल्‍सच्‍या अपघातानंतर ९ जुलैच्‍या रात्री त्‍या महामार्गासह अन्‍य ३ मार्गांवर वाहनांची विशेष पडताळणी मोहीम राबवण्‍यात आली.

बसचालक शेख दानिश मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याने अपघात घडल्‍याची शक्‍यता !

प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्‍यामुळे अपघात झाला का ?’, याचे अन्‍वेषण केले. त्‍यासाठी टायरच्‍या खुणा आणि नमुनेही पडताळण्‍यात आले; पण रस्‍त्‍यावर टायर फुटल्‍याच्‍या कोणत्‍याही खुणा आढळल्‍या नाहीत.

‘कदंब’ बसगाड्यांवरील पानमसाल्याची विज्ञापने हटवणार ! – कदंब महामंडळ

कदंब बसगाड्यांवरील ‘विमल’चे विज्ञापन हे तंबाखूविषयी असल्याने या विज्ञापनाला आधुनिक वैद्य, शिक्षक आदी सर्वच स्तरांतून विरोध होत होता.

अपघातग्रस्‍त बसच्‍या विदर्भ ट्रॅव्‍हल्‍सवर आतापर्यंत अनेक नियमांचे उल्लंघन प्रकरणी दंड

संबंधित बस आस्‍थापनाने अनेक वेळेला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्‍याप्रकरणी त्‍यांना दंड झाला आहे; मात्र कधीही तो दंड भरलेला नाही. अपघात झाल्‍यानंतर मात्र अवघ्‍या काही घंट्यांत सर्व दंड ‘ऑनलाईन’ भरण्‍यात आले.