सातारा जिल्ह्यातील २०० हून अधिक शासकीय वाहने भंगारात !

शासकीय कार्यालयातील मुदत संपलेली वाहने १ मेपासून भंगारात काढण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील २०० हून अधिक शासकीय वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत.

पुण्यात ६२२ सरकारी कर्मचार्‍यांवर शिरस्त्राण परिधान न केल्याने आर्.टी.ओ.ची कारवाई !

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे शहर वाहतूक पोलीस अन् आर्.टी.ओ. (प्रादेशिक परिवहन कार्यालय) प्रशासनाला शहरातील सरकारी कार्यालयात शिरस्त्राण परिधान न करणार्‍या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

गोवा : ‘माझी बस’ योजनेअंतर्गत कदंब महामंडळाला खासगी बसगाड्या चालवायला घेण्यास संमती

या योजनेच्या अंतर्गत कदंब वाहतूक महामंडळाला खासगी बसगाड्या चालवण्यासाठी घेण्यास मान्यता मिळणार आहे. ही योजना प्रारंभी ‘काणकोण-पणजी’, ‘पेडणे-पणजी’, ‘सावर्डे-पणजी’ आदी निवडक ४ मार्गांवर लागू केली जाणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती : हेल्मेट न वापरणार्‍यांना १ सहस्र दंड !

रस्ते अपघात वाढले आहेत. यात दुचाकी आणि पादचारी यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही गोष्ट रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे.

गोवा : १५ वर्षे जुनी असलेली १ लाख ९२ सहस्र वाहने कालबाह्य ठरणार !

गोव्यात सध्या १५ वर्षांपेक्षा अधिक काळ जुनी असलेली जवळजवळ १ लाख ९२ सहस्र वाहने असून ती भंगारात काढण्यायोग्य आहेत. भंगारात काढल्या जाणार्‍या वाहनांमध्ये व्यावसायिक वापरासाठी असलेली वाहने अधिक प्रमाणात आहेत.

विमा आस्‍थापनांकडून रिक्‍शाचालकांची लूट !

विमा आस्‍थापनांकडून ‘थर्ड पार्टी इन्‍शुरन्‍स’च्‍या नावाने अनेक रिक्‍शाचालकांची लूट केली जात आहे. नियमाप्रमाणे विम्‍यासाठी वार्षिक केवळ २ सहस्र रुपयांची रक्‍कम भरायची असतांना रिक्‍शाचालकांना वार्षिक ७ सहस्र रुपये देणे बंधनकारक केले आहे.

गोव्यात ‘स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे’ १ जूनपासून कार्यान्वित होणार ! – वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो

वाहतूक विभाग ‘सीसीटीव्ही कॅमेर्‍यां’द्वारे टीपलेल्या नियमांच्या उल्लंघनासाठी ‘ई-चलन’ काढणार आहे. हे ‘ई-चलन’ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍याला थेट त्याच्या भ्रमणभाषवर पाठवले जाणार आहे.

कदंब महामंडळाच्या ‘इलेक्ट्रिक बस’मुळे गोव्यात कार्बन उत्सर्जनात घट ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

कदंब महामंडळाच्या सर्व बसेस इलेक्ट्रिक करण्याचे सरकारचे ध्येय असून यामुळे कार्बन उत्सर्जनात १०० टक्के घट होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुंबई-पुणे महामार्गावर ४० सहस्र ९०९ वाहनांवर कारवाई !

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !

कारवाईची आकडेवारी सांगण्‍यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे त्‍यांच्‍याशी संगनमत आहे का ?