पुणे परिवहन विभागाकडून खासगी ट्रॅव्‍हल्‍सनी अधिकचे भाडे आकारल्‍याच्‍या तक्रारीसाठी हेल्‍पलाईन क्रमांक !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आर्.टी.ओ.) निश्‍चित करून दिलेल्‍या कमाल तिकिट दरापेक्षा अधिक तिकिट रक्‍कम वसूल करणार्‍या खासगी वाहतूकदारांवर कारवाई करणार. तक्रारदारांनी थेट परिवहन विभागाच्‍या ‘८२७५३०३१०१’ या भ्रमणभाष क्रमांकावर ‘व्‍हॉट्‌सअ‍ॅप’या सामाजिक माध्‍यमातून तक्रार करावी. तक्रारींवर त्‍वरित कारवाई केली जाईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.

दिवाळीमध्‍ये खासगी गाडीने प्रवास करणारे अधिक असतात. त्‍यामुळे खासगी बसचालक अधिक दर आकारतात, अशा तक्रारी प्रवाशांकडून केल्‍या जात आहेत. त्‍या पार्श्‍वभूमीवर पुणे येथील सर्व खासगी बसमालकांची बैठक परिवहन कार्यालयामध्‍ये झाली. यामध्‍ये बसमालकांना दरवाढीबरोबरच प्रवासी, बसची सुरक्षितता, चालकांचे आरोग्‍य, स्‍वच्‍छता आणि वाहतुकीच्‍या नियमांचे काटेकोर पालन करण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत.