कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्याविषयीचे निवेदन तहसीलदार समीर यादव यांना २६ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले.

सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीस उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने ठिकठिकाणी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत मंडळांच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या सर्वांनी गणेशोत्सवात धर्मप्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

 हिंदुद्वेषी मुन्नवर फारूकी याच्या कार्यक्रमाला देहली पोलिसांनी अनुमती नाकारली

हिंदू संघटित झाल्यास धर्महानी रोखली जाऊ शकते, याचे हे उदाहरण होय !

हिंदूंच्या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धार्मिक पक्षपात यांविरोधात मुलुंड तहसीलदारांना निवेदन !

देशभरात हिंदूंच्या होणार्‍या हत्या आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने मुलुंड येथील तहसीलदार डॉ. संदीप थोरात यांना निवेदन देण्यात आले.

बेती, वेरे येथील ‘ॲथर’ शो-रूमच्या प्रवेशद्वारावरील श्री गणेशाचे विडंबनात्मक चित्र प्रबोधनानंतर हटवले

‘‘कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता, तरी संबंधित मालकाशी चित्र काढण्याविषयी बोलून घेतो.’’ यासाठी ‘ॲथर’ शो-रूमच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन !

महाराष्ट्रातील गडदुर्गांचे संवर्धन करण्याचे, तसेच त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश !

गडदुर्गांच्या रूपात राज्याला लाभलेला ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या सांस्कृतिक कार्यमंत्र्यांचे अभिनंदन !

महाराष्ट्रातील सर्वच आश्रमशाळा आणि वसतीगृह यांच्या चौकशीचे आदिवासी विकासमंत्र्यांचे आदेश !

नवी मुंबईतील ‘बेथेल गॉस्पेल चॅरिटेबल ट्रस्ट’ या चर्चच्या अंतर्गत असलेल्या आश्रमशाळांमध्ये अनेक अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी दोषींना अटक करण्यात आली.

जिहाद्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. संघटनांवर बंदी घाला !

देशभरात हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी जिहाद्यांवर कठोर कारवाई करा, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. यांसारख्या संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे निवेदन..

प्रशासनाने ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना न राबवता पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्यावी ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

इचलकरंजी येथील समस्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, तसेच विविध संघटना यांनी पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

गणेशोत्सवातील तथाकथित प्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘गणेशमूर्तीदान’ या धर्मबाह्य संकल्पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना तातडीने थांबवा !

हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा प्रशासन आणि सांगली महापालिका यांना निवेदन