कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्यात यावी !

हिंदु जनजागृती समितीचे फलटण (जिल्हा सातारा) येथे प्रशासनास निवेदन

फलटण (जिल्हा सातारा), २७ ऑगस्ट (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देऊ नये, तसेच त्यांची विक्री आणि विसर्जन यांवर बंदी घालण्याविषयीचे निवेदन तहसीलदार समीर यादव यांना २६ ऑगस्ट या दिवशी देण्यात आले. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप झणझणे, तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते शैलेंद्र नलवडे, आशिष कापसे, अक्षय तावरे, मंगेश खंदारे, राजू इपते, महेश यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. उदय ओझर्डे, सौ. शैलेजा देशपांडे आदी उपस्थित होते.