३१ डिसेंबर साजरा करून १ दिवसाचे मानसिक धर्मांतर करू नका ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती
३१ डिसेंबर साजरा करणे ही हिंदू संस्कृती नाही. मद्याच्या नशेत धुंद होऊन नाचणे, ‘रेव्ह पार्ट्या’ करणे, अशा कृती या दिवशी सर्रास केल्या जातात. या रात्री मद्यधुंद झाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात, तसेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमाणही वाढते.