आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !

  • केंद्र सरकारसमवेतच्या बैठकीनंतर कॉकरोच जनता पक्षाने दिली माहिती

  • उद्या पुन्हा सरकारसमवेत होणार चर्चा

संसदीय मंत्री जितेंद्र सिंह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा (डावीकडून)

नवी देहली – केंद्र सरकारने कॉकरोच जनता पक्षाला (‘सीजेपी’ला) चर्चेसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, तसेच संसदीय मंत्री जितेंद्र सिंह यांची येथील ‘कान्स्टिट्यूशन क्लब’ येथे भेट घेतली. या वेळी १० मिनिटे चर्चा झाली. यानंतर रांका यांनी बाहेर येऊन प्रसारमाध्यमांना सांगितले की, आमची सरकारशी १० मिनिटे चर्चा झाली. आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या आहेत. ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांना १ कोटी रुपयांची भरपाई मिळावी. आंदोलकांविरुद्ध नोंदवण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राच्या सूत्रावर कोणतीही तडजोड झालेली नाही. उद्या (२५ जुलैला) सरकारशी पुन्हा चर्चा होईल. सरकारने धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राच्या आमच्या मागणीवर उद्या दुपारपर्यंतचा वेळ मागितला आहे. सरकार त्यांना लवकरच पदावरून हटवेल, अशी आम्हाला आशा आहे.