
ढाका (बांगलादेश) – देशाचे राष्ट्रपती महंमद शहाबुद्दीन त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच; म्हणजे २ वर्षे आधीच त्यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. महंमद शहाबुद्दीन यांनी एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारली होती. जुलै-ऑगस्ट २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनानंतर ‘अवामी लीग’चे सरकार सत्तेवरून पायउतार झाले. या आंदोलनामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावे लागले होते. अवामी लीग सरकारच्या काळातील केवळ शहाबुद्दीन हेच असे एकमेव घटनात्मक विद्यमान पदाधिकारी आहेत, ज्यांचे आजतागायतपद कायम होते. ‘प्रथम आलो’ या वृत्तपत्राने एका वरिष्ठ सरकारी अधिकार्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच शेख हसीना यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे सरकार अप्रसन्न आहे. बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, शहाबुद्दीन आणि शेख हसीना यांच्यातील दूरभाषवरून कथित संभाषण हे त्यागपत्राचे एकमेव कारण नाही. त्या नेत्याच्या मते शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची घोषणा केल्यापासून देशातील राजकीय वातावरण अधिकच संवेदनशील बनले आहे.
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
Recognize Israel : नागरी अणू करारासाठी सौदी अरेबियाने इस्रायलला मान्यता द्यावी !
Asians Attacked In NY : न्यूयॉर्क (अमेरिका) येथे २ आशियाई वंशाच्या व्यक्तींवर चाकूने आक्रमण !
Bangladesh Foreign Affairs Minister : (म्हणे) ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत त्याच्या लोकांच्या समस्यांकडे लक्ष देईल, अशी आशा !’
अमेरिकेने भारतावर लादले १० टक्के अतिरिक्त आयात शुल्क
सीमापार आतंकवादामुळे सहकार्याचा आधार संपला !