साकीनाका येथे गोदामांना भीषण आग

गोदामांना भीषण आग

मुंबई – साकीनाका येथील ९० फूट रस्त्यावर गोदामांना २८ डिसेंबर या दिवशी भीषण आग लागली होती. ही गोदामे टिश्यू पेपरची असल्याचे सूत्रांनी सांगितले. या आगीत तीन गोदामे आणि एक घर जळून खाक झाले आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या पाच गाड्यांनी ही आग विझवली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.