जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !

पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी एका पोस्टमध्ये, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! असे म्हटले आहे.

Ram Mandir Darshan : श्रीराममंदिरात दर्शनासाठी दुसर्‍या दिवशीही भाविकांची रीघ !

गर्दीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने मंदिराच्या वेळेत दुसर्‍याच दिवशी पालट केला असून आता मंदिर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी उघडे असणार आहे.

OIC On Ram Mandir : (म्हणे) ‘इस्लामी स्थळांना उद्ध्वस्त करणार्‍या अशा उपाययोजनांचा आम्ही निषेध करतो !’ – ओ.आय.सी.

हिंदूंच्या धार्मिक स्थळांना गेल्या ५०० वर्षांत मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि आजही पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये तेच केले जात आहे. त्याविषयी या इस्लामी संघटनेने तोंड उघडले पाहिजे !

Ram Mandir Hanuman Darshan : अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या दर्शनाला आले वानर !

ज्या भाविकांनी हे दृश्य पाहिले ते स्वतःला भाग्यवान समजत आहेत. ‘आमच्यासाठी हा भाग्याचा क्षण होता की, आम्ही रामाची मूर्ती आणि हनुमान यांचे दर्शन घेतले’, असे ते म्हणत होते.

श्रीराम : धर्मसंस्कृती रक्षक !

डळमळीत झालेली आपली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या घटस्फोटांची संख्या, यामुळे आजची संस्कृती अधोगतीच्या दिशेने वाटचाल करिता असतांना श्रीरामाच्या नीतीनियमांचा पुरस्कार केल्यास आपल्या संस्कृतीला बळकटी आणण्याजोगी स्थिती देशांमध्ये निश्चित निर्माण होऊ शकते.

अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणी आणि हिंदुत्व यांविषयी साधूसंतांचे कार्य !

धर्मसम्राट करपात्रीस्वामी सुरू केलेले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेला त्याग हा सर्व हिंदूंना लक्षात राहावा या करिता वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी लिहिलेला लेख.

‘श्रीराममंदिर’ या शब्दातील आद्याक्षरांवरून साधिकेला सुचलेले कृतज्ञतारूपी काव्य !

मंदिराची उभारणी झाली, प्रतीक्षा संपली । दिवे लावूया घरोघरी, अंगणी घालूया सडा रांगोळी । रमले सर्व रामचरणी, रामराज्याची चाहूल लागली ।

अशी सजली अयोध्यानगरी !

राममय झाल्याची अनुभूती लक्षावधी हिंदूंना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.

श्री रामललाचा एकमेवाद्वितीय असा ११ कोटी रुपयांचा मुकुट !

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री रामलला यांच्यासाठी गुजरातच्या सुरत येथून ११ कोटी रुपयांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट पाठवण्यात आला होता.