‘श्रीराममंदिर’ या शब्दातील आद्याक्षरांवरून साधिकेला सुचलेले कृतज्ञतारूपी काव्य !

‘अयोध्या नगरीत प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधून सिद्ध झाले आहे. श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२.१.२०२४ या दिवशी झाली. संपूर्ण जगात सर्वांच्याच मनात या मंदिराविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वांचा आनंद आणि उत्साह याला पारावार राहिला नाही. ‘श्रीराममंदिर’ या शब्दातील अद्याक्षरांवरून सुचलेले कृतज्ञतारूपी काव्य प्रभु श्रीरामाच्या चरणी अर्पण !

सौ. प्रज्ञा जोशी

श्री – श्रीराम ज्योतीने साजरी करूया दीपावली ।

रा – राममंदिराची कीर्ती जगभर झाली ।

म – मनमंदिरात रामरायाची स्थापना झाली ।

मं – मंदिराची उभारणी झाली, प्रतीक्षा संपली ।

दि – दिवे लावूया घरोघरी, अंगणी घालूया सडा रांगोळी ।

र – रमले सर्व रामचरणी, रामराज्याची चाहूल लागली ।

बोला ऽऽ जय श्रीराम ऽऽ !’

– श्रीरामाची खारुताई,

सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१२.२०२३)