OIC On Ram Mandir : (म्हणे) ‘इस्लामी स्थळांना उद्ध्वस्त करणार्‍या अशा उपाययोजनांचा आम्ही निषेध करतो !’ – ओ.आय.सी.

  • ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची (ओ.आय.सी.) टीका

  • ५७ इस्लामी देशांच्या संघटनेचा श्रीराममंदिराला विरोध

जेद्दा (सौदी अरेबिया) – अयोध्येत श्रीराममंदिराचे उद्घाटन आणि श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर पाकिस्तानने भारतावर टीका केल्यानंतर आता ५७ इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) हिनेही टीका केली आहे. या संघटनेने प्रसारित केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भारतातील अयोध्या येथे ज्या ठिकाणी पहिल्यांदा बाबरी मशीद पाडली गेली त्याच ठिकाणी श्रीराममंदिराचे बांधकाम आणि त्यानंतर तेथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे ही चिंतेची गोष्ट आहे. गेल्या सत्रात परराष्ट्रमंत्री परिषदेच्या बैठकीतही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. बाबरी मशिदीसारख्या महत्त्वाच्या इस्लामी स्थळांना उद्ध्वस्त करणार्‍या अशा उपाययोजनांचा आम्ही निषेध करतो. बाबरी मशीद तेथे ५ शतके राहिली.

संपादकीय भूमिका

  • चीनमध्ये १० लाख उघूर मुसलमानांना सुधारगृहात ठेवून सर्व इस्लामी परंपरा पाळण्यास बंदी घालण्यात आली आहे. याविषयी इस्लामी संघटना एक शब्दही तोंडातून काढत नाही; मात्र भारताला डोळे वटारून दाखवण्याचा फुकाचा प्रयत्न करते !
  • हिंदूंच्या धार्मिक स्थळांना गेल्या ५०० वर्षांत मुसलमान आक्रमकांनी उद्ध्वस्त केले आणि आजही पाकिस्तान, बांगलादेश या इस्लामी देशांमध्ये तेच केले जात आहे. अन्य इस्लामी देशांत हिंदूंना त्यांची धार्मिक स्थळे बांधण्यास अनुमती दिली जात नाही, त्याविषयी या इस्लामी संघटनेने तोंड उघडले पाहिजे !
  •  ‘भारताच्या अंतर्गत गोष्टीत नाक खुपसू नये’, अशी समज भारत सरकारने या संघटनेला दिली पाहिजे !