श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासासाठी निधी अर्पण करण्याचे विश्‍व हिंदू परिषदेचे आवाहन

अधिकाधिक लोकांनी मंदिर उभारणीसाठी अर्पण करावे -विश्‍व हिंदू परिषद

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने श्रीरामजन्मभूमीला निधी अर्पण

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सातारा विभागाच्या वतीने श्रीरामजन्मभूमी निधी संकलन अभियानास अर्पण निधी म्हणून ११ सहस्र १११ रुपयांचा धनादेश देण्यात आला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी यांच्या वंदनीय उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.

विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण अभियान ! – दादा वेदक, विश्‍व हिंदु परिषद

देशातील बहुसंख्य नागरिकांचा सहभाग असावा, या उद्देशाने विश्‍व हिंदु परिषदेच्या वतीने १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारीअखेर निधी समर्पण अभियान राबवण्यात येणार आहे.

आंध्रप्रदेशात श्रीराममंदिरातील श्रीरामाच्या प्राचीन मूर्तीचे शिर अज्ञातांनी तोडले !

पाक असो कि भारत हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात आणि हिंदू गप्प रहातात ! आंध्रप्रदेशात ख्रिस्ती मुख्यमंत्री आल्यापासून अशा घटना वाढत आहेत; मात्र निधर्मीवादी यावर मौन बाळगून आहेत आणि प्रसारमाध्यमे गांधींच्या माकडांप्रमाणे वागत आहेत !

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीस सर्व समाजाने हातभार लावावा ! – प.पू. सुंदरगिरी महाराज

अयोध्येत श्रीराम मंदिराची होत असलेली उभारणी सर्व देशवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशवासियांकडून मंदिर उभारणीस सढळ हाताने साहाय्य केले जात आहे. त्यामुळेच श्रीमंतासोबत गोरगरिबांचा निधी महत्त्वाचा आहे.

अयोध्येनंतर मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’

ज्या प्रकारे हिंदू संघटित होऊन पुढे जात आहेत, ते पहाता आपले लवकरच ‘हिंदु राष्ट्रा’चे स्वप्न पूर्ण होईल, हे स्पष्ट होते. स्वार्थापलीकडे जाऊन समाज आणि धर्म यांसाठी कार्य केले पाहिजे. मीही शेवटच्या श्‍वासापर्यंत हिंदुत्वासाठी कार्य करणार आहे. अयोध्या आपली झाली, आता मथुरा, काशी आणि भोजशाळा यांची वेळ आहे,

रामजन्मभूमीमध्ये सपाटीकरणाच्या वेळी सापडल्या मूर्ती आणि शिवलिंग !  

येथील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. या कामाच्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, वेगवेगळ्या आकृत्यांचे आणि कलाकुसरीचे दगड, ७ ब्लॅक टच स्तंभ, लाल वाळूच्या दगडांचे ६ स्तंभ, पुष्पकलश आणि ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग सापडले आहे.

अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्‍या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.