पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांची पोस्ट
इस्लामाबाद (पाकिस्तान) – अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पाकिस्तानचे माजी हिंदु क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी ‘एक्स’वरून विविध पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. एका पोस्टमध्ये ते म्हणाले की, शेकडो वर्षांची प्रतीक्षा पूर्ण झाली, प्रतिज्ञा पूर्ण झाली आणि प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली ! अन्य एका पोस्टमध्ये त्यांनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असे म्हटले आहे.
जयतु जयतु हिंदुराष्ट्रम।
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 23, 2024
सदियों को प्रतीक्षा पूर्ण हुई, प्रतिज्ञा पूर्ण हुई, प्राण-प्रतिष्ठा पूर्ण हुई। pic.twitter.com/4hhNm2MDoS
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 22, 2024
Jai Shri Krishna! pic.twitter.com/sVFhKf2qLN
— Danish Kaneria (@DanishKaneria61) January 22, 2024
‘कृष्ण लला हम आएंगे, माखन वहीं खिलाएंगे’ असे लिहिलेले आणि योगी आदित्यनाथ अन् श्रीकृष्णजन्मभूमी यांची छायाचित्रे असलेले एक चित्र पोस्ट करत त्यांनी ‘जय श्रीकृष्ण ।’, असेही लिहिले आहे. अन्य एकामध्ये श्री रामललाचे छायाचित्र पोस्ट करत त्यांनी म्हटले, ‘मेरे राम।’