रामसेतूसारखी रचना पूर्वी अस्तित्वात असल्याचे संकेत !

केंद्र सरकारचे संसदेत विधान ! ‘रामसेतू’ असल्याचे मानले जाते त्या ठिकाणची उपग्रहांद्वारे छायाचित्रे काढण्यात आली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे, तर खरे रूप तेथे आहे, हे सांगणे अवघड आहे. तथापि असे काही संकेत आहेत, जे सूचित करतात की, अशा प्रकारची रचना तेथे अस्तित्वात असू शकते.

लोकशाहीची दुरवस्था !

राज्यसभेचे मावळते अध्यक्ष तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेच्या कामकाजाविषयी मांडलेली आकडेवारी कुठल्याही लोकशाहीप्रेमीसाठी खेदजनक आहे.

दगाफटका करणाऱ्या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाफटका केला नाही. घोडेबाजारात उभे होते, त्यांची ६-७ मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणता व्यापार केला नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचे धनंजय महाडिक विजयी !

राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांपैकी भाजपचे ३, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १ उमेवार विजयी झाले. ६ व्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार, तर भाजपचे धनंजय महाडिक रिंगणात होते.

भाजप नेत्या पंकजा मुंडे समर्थकांकडून भाजप कार्यालयासमोर आंदोलन; कार्यकर्त्यांची धरपकड !

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री सौ. पंकजा मुंडे यांना प्रथम राज्यसभा आणि आता विधान परिषदेसाठी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांच्या ४ समर्थकांनी उस्मानपुरा येथील भाजप कार्यालयासमोर ९ जून या दिवशी घोषणा देत आंदोलन केले.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी एम्.आय.एम्.कडून महाविकास आघाडीकडे सहकार्याचा प्रस्ताव !

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना या दोघांना अपक्ष आमदारांच्या साहाय्याची आवश्यकता आहे.

लालूचशाही नव्हे ना ?

‘लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था ’, हे कागदावरच आहे, जनताही अधिक पैसे देणाऱ्या उमेदवाराला मत देते किंवा मतदानच करत नाही. ‘योग्य व्यक्ती निवडण्याचा पर्याय जनतेकडे नाही’; कारण बहुतांश उमेदवार हे स्वकर्तृत्वावर निवडून येऊ शकत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती आहे.

राज्यसभेत भाजपचे संख्याबळ १०० !

राज्यसभेत प्रथमच भाजपची सदस्य संख्या १०० झाली आहे. हा विक्रम करणारा भाजप वर्ष १९९० नंतरचा पहिला पक्ष ठरला आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे संख्याबळ अल्प, म्हणजे केवळ २९ झाले आहे.

बंगालमधून लोक पलायन करत असल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा !

राज्यसभेत मागणी करतांना भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांना अश्रू अनावर  !