मदरशांना आधुनिक बनवण्यासाठीचा विशेष निधीच्या मागणीचा प्रस्ताव राज्यसभेने फेटाळला !

नवी देहली – मुसलमान समाजातील मागासलेपण दूर करण्यासाठी मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी विशेष निधीची मागणी करण्याचा प्रस्ताव राज्यसभेने फेटाळला. अखिल भारतीय मुस्लिम लीगचे सदस्य अब्दुल वहाब यांनी हा प्रस्ताव मांडला होता. महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सर्वानुमते हा प्रस्ताव रहित करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आवाजी मतदानाने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. इराणी प्रस्तावाविषयी म्हणाल्या की, हा प्रस्ताव समाजात असमानता निर्माण करू शकला असता, तसेच धर्माच्या आधारावर लोकांची विभागणी झाली असती.

संपादकीय भूमिका

मदरशांतून आतंकवादाला प्रोत्साहन दिले जाते, धर्मांधता आणि जिहादी मानसिकता निर्माण होते, अश्‍लील कृत्य घडतात, असेच आतापर्यंत दिसून आले असल्याने संसदेत देशातील मदरसे बंद करण्याचाच प्रस्ताव सादर करून तो बहुमताने संमत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे !