(म्हणे) ‘अंबानी आणि अदानी रोजगार निर्माण करतात; म्हणून त्यांची पूजा केली पाहिजे !’ – भाजपचे खासदार के.जे. अल्फोन्स

पूजा ही केवळ देवतांची केली जाते, कुठल्याही व्यक्तीची नाही. त्यामुळे अशी विधाने करतांना निदान भाजपच्या नेत्यांनी तरी याचे भान राखले पाहिजे !

स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेस नसती, तर भारतातील लोकशाही घराणेशाहीपासून मुक्त राहिली असती !

काँग्रेसने घराणेशाहीच्या पुढे कधीच विचार केला नाही. देशाला सर्वांत मोठा धोका हा घराणेशाही असलेल्या पक्षांपासून आहे. पक्षात जेव्हा एक कुटुंब प्रभावशाली बनते, तेव्हा सर्वांत पहिले गुणवत्तेला लक्ष्य केले जाते.

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाविषयी लवकरच सकारात्मक निर्णय घेणार !- अर्जुनराम मेघवाल, केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री

मराठी भाषा आणि या दर्जेदार साहित्याचा निश्चित अभिमान आहे. या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्र सरकारही प्रयत्नशील आहे. त्यानुसार लवकरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार आहे,.

गोहत्या बंदी कायदा आणि गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा !

अशी मागणी का करावी लागते ? आतापर्यंत सरकारनेच गोहत्या बंदी कायदा आणि गायीला राष्ट्रीय पशू घोषित करणे आवश्यक होते, असेच हिंदूंना वाटते !

काश्मीरमधून कलम ३७० रहित केल्यानंतर एकही काश्मिरी हिंदू विस्थापित झाला नाही ! – केंद्र सरकार

कलम ३७० रहित केल्यापासून आतापर्यंत किती काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यात आले ?, किती जणांनी तेथे भूमी विकत घेतली ?, याची माहितीही सरकारने द्यावी, असे हिंदूंना वाटते !

राज्यसभेतील विरोधकांच्या गोंधळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांत अश्रू !

अशा घटना रोखण्यासाठी सभापती नायडू यांनी भावनाशील होण्याऐवजी कठोर होऊन गोंधळ घालणार्‍या संबंधित सदस्यांना निलंबित करून त्यांच्याकडून वाया गेलेल्या वेळेचा खर्च वसूल केला पाहिजे !

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ६८० सैनिकांनी गेल्या ६ वर्षांत केली आत्महत्या

एवढ्या मोठ्या संख्येने सैनिक आत्महत्या करतात, याचा अर्थ त्यांचे मनोधैर्य वाढवण्यात आणि त्यांच्या समस्या सोडवण्यात सरकार अन् प्रशासन तोकडे पडत आहे, असेच लक्षात येते !

राज्यसभेत गोंधळ घालणारे तृणमूल काँगेसचे ६ खासदार निलंबन

राज्यसभेतील सभापतींच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घातल्याच्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या ६ खासदारांना निलंबित करण्यात आले.

गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया !

हे चित्र भारतातील लोकप्रतिनिधींना लज्जास्पद ! गदारोळ घालणार्‍या खासदारांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रहित करून जनतेच्या पैशांची झालेली हानी त्यांच्याकडून वसूल करा, तरच अन्य बेशिस्त खासदारांवर वचक बसेल !

गेल्या ७ वर्षांत सैन्यातील ८०० सैनिकांची आत्महत्या !

मानसिकदृष्ट्या सक्षम नसणारे सैनिक जनतेचे रक्षण तरी कसे करू शकणार ? सैनिक साधना करत नसल्याने ‘प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्थिर कसे रहायचे’, हे त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे ते अशा प्रकारचे पाऊल उचलतात !