स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

पुणे आणि चिंचवड येथे होणार्‍या धर्मशिक्षणवर्गातील धर्मप्रेमींनी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या माध्यमातून सक्षम होण्याचा केला निर्धार !

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना करात सवलत मिळणार !

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ४ सहस्र ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत मालमत्ता धारकांच्या कुटुंबियांना पुढील आर्थिक वर्षात सामान्य करात १०० टक्के सवलत देण्यात येणार !

आरोग्य विभागाच्या पेपरफुटीप्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी कह्यात !

पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. चुकीच्या मार्गाने परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार कधीतरी प्रामाणिकपणे काम करतील का ? त्यांनाही शिक्षा म्हणून पुढील काही वर्षे परीक्षा देण्यापासून वंचित ठेवायला हवे.

भारताला आत्मनिर्भर होण्यासाठी विविध तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देण्याची आवश्यकता ! – निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रेय शेकटकर

बदलत्या युद्धनीतीनुसार तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधक, विद्यार्थी यांनी नवनवीन कल्पना आणि संशोधन यांवर भर देण्याचे आवाहन शेकटकर यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील संपर्क अभियान दौर्‍यात राष्ट्र आणि धर्म प्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

‘ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ आणि हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात संत, लोकप्रतिनिधी, व्यापारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना संपर्क !

वढू-तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था !

नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कायमस्वरूपी रस्ता का करत नाही ? राष्ट्रपुरुषांप्रतीचे कर्तव्य पार न पाडल्याने जाणीव करून द्यावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंहगड रस्ता, पुणे येथे श्रीमद् भागवत कथा कार्यक्रम पार पडला !

कार्यक्रमात आयोजकांकडून सनातन-निर्मित ३० धर्मशिक्षण फलक ग्रंथांचे विनामूल्य वाटप !

पुरातन मंदिरांसह इतर ऐतिहासिक वास्तूंचे जतन केलेच पाहिजे ! – डॉ. राहुल देशपांडे, मंदिर अभ्यासक

डॉ. देशपांडे म्हणाले, ‘‘मंदिर म्हणजे अभिजात कला, शास्त्र आणि नियम, संवेदना, सम्यक अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विज्ञान, रुढी आणि अव्यक्त विचारप्रणाली या सर्वांचा सुरेख संगम असतो.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे येथे ‘ओमिक्रॉन’ विषाणू बाधित ७ रुग्ण आढळले

कोरोना विषाणूचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’ या विषाणूने बाधित ७ रुग्ण पिंपरी चिंचवड, तसेच पुणे येथे आढळले आहेत. यात पिंपरी चिंचवड येथे नायजेरिया येथून आलेली महिला व फिनलँड येथून पुण्यात आलेल्या एका रुग्णाला बाधा झाली आहे.

सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग आवश्यक ! – डॉ. नीलम गोर्‍हे, विधान परिषद उपसभापती

महिलांच्या सुरक्षिततेसमवेत महिला सक्षमीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सर्वच क्षेत्रांत महिलांचा ५० टक्के सहभाग असणे आवश्यक आहे, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.