प्रभाग रचनेच्या कच्च्या प्रारूप आराखडयाचे काम अंतिम टप्प्यात !

महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सिद्ध करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते…

पुणे विभागात लाचखोरीची १०२ प्रकरणे उघडकीस !

लाचखोरीमध्ये सरकारी विभाग अग्रस्थानी असणे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस विभाग तिसर्‍या क्रमांकावर असेल, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? खोलवर मुरलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी कठोर शिक्षाच हवी.

‘किल्ले राजगड उत्सवा’त ३५५ वा आग्य्राहून सुटका स्मृतीदिन साजरा होणार !

पुणे महापालिका आणि ‘श्री शिवाजी राजगड स्मारक मंडळ, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन !

चारित्र्यसंपन्न समाज घडवा ! – राज्यपाल

भक्ती, ज्ञान आणि कर्म यांच्या साहाय्याने चारित्र्यसंपन्न समाज घडवण्याचे कार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी धर्माची पूजा म्हणजेच समष्टी साधनेत सहभागी व्हा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पुणे आणि सांगली येथील धर्मप्रेमी अन् जिज्ञासू यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा पार पडला !

संत ज्ञानेश्वर माऊलींचे विचार शाश्वत असून मानवकल्याणासाठी आवश्यक ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी २९ नोव्हेंबर या दिवशी आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

मराठा आरक्षणाची भीक नको, आमच्या बौद्धिक क्षमतेवर यश खेचून आणू ! – नानासाहेब पाटील, माजी अतिरिक्त मुख्य सचिव

नानासाहेब पाटील पुढे म्हणाले की, सध्या शेती अनेक संकटातून जात आहे. आगामी काळात ती उदरनिर्वाहाचे साधन होणार नाही. विहिर काढण्यासाठी कर्ज घेऊ नका, तर मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घ्या.

काळजी म्हणून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील कोविड सेंटर चालू रहातील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सध्या तरी पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमधील ‘जम्बो कोविड सेंटर’ चालूच राहील आणि ३१ डिसेंबरला आढावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले.

पुणे जिल्ह्यातील ४४३ गावांतील नागरिकांनी घेतले लसीचे दोन्ही डोस !

संपूर्ण पुणे जिल्ह्याची १०० टक्के निर्बंधमुक्तीकडे वाटचाल चालू आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे हडपसर (पुणे) येथे उत्साहात स्वागत !

‘श्री हरि विठ्ठल’ नामघोषात पालखीचे भाविकांनी दर्शन घेतले. या पालखीसमवेत महाराष्ट्राच्या विविध भागांतून अनेक दिंड्या सहभागी झाल्या आहेत.